सकाळचे ५ वाजले होते. अलार्म वाजला,प्रज्ञा ने पांघरुणातून हळूच हात काढून तो बंद केला.इतक्यात ती खडबडून जागी झाली आज शेवटचा पेपर आहे,मग थोड वाचायला हव म्हणत तिने पांघरून बाजूला करत समाज - शास्त्राचे पुस्तक काढून सुरुवात केली. मार्क्स,दुर्खीम,पर्सन हे जवळपास पाठ झाले म्हणत तिने पुस्तक ठेवली आणि परीक्षेसाठी जाण्यास तयार होऊ लागली. नऊ वाजण्याच्या सुमारास ती पेन हॉल तिकीट घेऊन आई चाल्ले म्हणून घराबाहेर पडली. ११ ला पेपर चालू झाला,तिने जे पाठांतर केल होत,ते सर्व प्रश्न आलेले पाहून मनातून एकदम खुश होती.पेपर चा वेळ संपला,टोल पडली तसे सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर पडत होती.आज शेवटचा दिवस म्हणून बाहेर भेटण्यासाठी सर्व जन थांबली होती.त्यातच प्रज्ञा हि बाहेर येऊन आपल्या वर्गातील मित्र - मैत्रीणीना शोधत होती.तशी ती स्वरा दिसली व तिच्या दिशेने जाऊन भेटली. आता १२ वी झाली,नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार याची अपेक्क्षा होती.त्यामुळे पुढे काय करणार हे सर्व जन एकमेकास विचारत होती,पुढे हि आपण सर्व जन एकत्र प्रवेश घ्यायचा असं सर्व जन ठरवले व दुपारचे ३ वाजत आलेले म्हणून प्रज्ञा पण तेथून घराकडे निघाली. एकदाची बारावी संपली, यापुढे सुट्ट्या व रोज रोज पुस्तक घेऊन बसाव लागणार नाही याविचाराने ती खुश होती व मोठ्या पावलांनी चालू लागली.
Monday, May 24, 2021
हुंडा
घरी येताच दारात बाबा उभे दिसले, त्यांनी विचारण्य आधीच प्रज्ञा ने सांगून टाकल पेपर खूप भारी होता.बाबानी छान - छान म्हणत स्मित हस्य दिले. ती आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन आली व आई - ए - आई जेवाय दे बघ !! खूप भूक लागली मला पेपर लिहून म्हणत आई ला घरात शोधु लागली. आईने लागलीच तिला जेवण्यास दिल, आई आताही स्वयंपाक घरात कशी काय व म्हणून तिने विचारलं आता का करत आहेस स्वयंपाक. कोणी येणार आहे का? आपल्या घरला ? त्यावर आई ने म्हटलं तुला बाबांनी काही सांगितलं नाही का? नाही , का कोण येणार आहेत ? आग तुला स्थळ आलेलं आहे लग्नासाठी...खिन्न चेहरा करून प्रज्ञा काही बोलू नको य!!!!
मी खर बोलतेय,तू जेवण कर पाहू लवकर व तयार हो ५ वाजता ते येणार आहेत, आई म्हणाली. प्रज्ञा चा घास गिळता गीळेना. ती आई ला समजावू लागली, मला नको ग करायचं आताच लग्न....बाहेरून बाबा आले,हे बघ मुलगा रेल्वेत आहे सेंटर गवरमेनट ची नोकरी आहे,तू राणी बनून राहशील तिथे.पण बाबा मला पुढे शिकायचं आहे,बाळा हो, पुढे शिक न,ते सुशिक्षित आहेत तुला नक्कीच शिकवतील.तुला काहीही काळजी करायची गरज नाही त्यामुळे तू लवकर तयार हो बघू म्हणत बाबा प्रज्ञा ची समजूत काढत होते. शेवटी प्रज्ञा हि तयार झाली व पाहुणे मंडळी आल्यानंतर चहा घेऊन बाहेर आली. मनोहर, त्याचे आई बाबा आलेले होते व मध्यस्ती कोणीतरी होता, त्याची तेवढी ओळख प्रज्ञा ला नव्हती. मनोहर ने प्रज्ञा ला पाहताच पसंत केलं,पण पुन्हा आम्ही कळवू म्हणत ते निघून गेले. रात्री त्यांचा फोन आला, आम्हाला मुलगी पसंत आहे पण हुंडा आम्हाला ८ लाख हवंय.त्यावर प्रज्ञा च्या बाबांनी तुम्हाला लवकरच कळवतो म्हणत ,त्यावर मनोहर च्या बाबांनी आम्हाला लवकर सांगा कारण तुमच्याने होत नसेल तर आम्हाला दुसरे स्थळ पाहता येतील,असं उदार वाक्य म्हणत फोन ठेवला.
प्रज्ञा चे बाबा झोपताना रात्री हे सर्व तिच्या आई ला सांगितले त्यावर तिने, थोड कमी करणार नाहीत का ? उद्या त्यांच्याकडे जाऊन बोलून या,...हे त्यांना हि पटल त्यामुळे सकाळी उठताच त्यांनी मनोहर च्या गावी निघाले.मनोहर चे बाबा आम्हाला पाहिजे तर ८ लाख, नसेल तर शक्य नाही म्हणून त्यांनी शब्द टाकला,स्थळ चांगल होत व मनोहर ला नोकरी म्हणून त्यांनी आता ५ लाख व पुन्हा 1 वर्ष नंतर ३ लाख देतो अशी बोलणी केली व त्यानच्या विवाह ची तारीख काढण्यात आली.
प्रज्ञा च्या मनात जरी नसल तरी आई - बाबा च्या विरोधात जाता येत नाही म्हणून तिने होकार दिला. अगदी 2 महिन्यांत लग्न झाल.प्रज्ञा सासरी आली, लग्न म्हणून मनोहर ने हि सुट्टी घेतलेली.१५ दिवसांनी मनोहर ची सुट्टी संपली व तो नोकरी च्या गावी परत गेला. पुन्हा क्वार्टर मिळाल कि आपण सर्व तिकडेच जाऊ म्हणत त्याने प्रज्ञा ला घरीच ठेवून गेला.तो गेल्यानंतर हळू हळू त्याची आई व प्रज्ञा ची सासू ने तिला मदत करणे टाळून सर्व कामे तिच्याकडून करून घेण्यास सुरुवात केली. रोज नवीन नियम घरात उदयास यायचा. जसे - बाहेरच्या बायकांशी बोलायचं नाही, मनोहर आणि तुझे बाबा यांना याबद्दल काही सांगायचं नाही म्हणजे आता तिचे हक्क एक एक करून काढून घेण्यात येत होते व ती गुलाम अवस्थेत जात होती.
एकेदिवशी पावसाळ्याची चाहूल लागताच सासूबाईने प्रज्ञा ला हुंड्याचा प्रश्न केला, तुझा बाप कधी देणार आहे राहिलेला हुंडा ?? यावर निरुत्तर स्वरूपातील उत्तर ऐकून सासू तिच्यावर रागावयास सुरुवात केली, रोज बोलते कि ग अवदसा फोनवर मग हे कामाचं तुला बोलता नाही येत का ? आता पुढच्या वेळी नक्की बोल म्हणत सासू ने तिला धमकावून सोडलं, ती बेडरूम मध्ये जाऊन एकटीच रडत बसली. काही दिवसांनी तिचा निकाल लागला, ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली म्हणून तिच्या बाबांनी तिला फोन केला, त्यावर ती तेवढ्या खुशीने प्रतिक्रिया त्यांना दिली नाही, तेव्हा बाबांनी काही झालं आहे का बाळा म्हणून विचारपूस करू लागले,तेवढ्यात तिने फोन ठेवला. हे त्यांच्या मनाला लागल म्हणून त्यांनी लगे दुसऱ्या दिवशी सासर गाठल. मग सासू आणि सासरे यांनी हुंडा साठी तमाशाच सुरु केला. ठीक आहे मी आणून देतो म्हणत ते निघून आले, प्रज्ञा च्या आईला सांगितलं त्यावर तिने म्हटलं बघा आपल्याला एकच मुलगी मग आपल्या माघाऱ्या आपल्या शेताला वारीस तीच आहे मग एक्कारभर शेत आपण तिच्यासाठी लिहून देऊयात व हुंडा फेडू एकदाचा, यावर थोड मनाला सुखद धक्का प्रज्ञा च्या बाबांना भेटला व त्यांनी हि तसच केल.
बारावी चा निकाल लागल्याने प्रज्ञा ने पुढील शिक्षण घेण्याचा प्रस्ताव मनोहर कडे ठेवला, त्यावर मनोहर ने सहमती दर्शवली पण हि गोष्ट जेव्हा त्याच्या आई ला समजली तेव्हा परत तिने तुला अक्कल नाहीय का ? म्हणत प्रज्ञा वर ओरडू लागली. शिकायचं होताच तर मग लग्न कशाला करून घेतलं. व आता लग्न केलाय तर तुला कुठ कमवायला जायचं आहे, आम्ही खाऊ घालत नाहीय का ? अशे प्रचंड बोलणे ऐकून ती एकदम निपचित झाली. काही दिवसांनी मनोहर सुट्टी वर आला,आल्या नंतर आई चे ऐकून त्यानेही तिच्यावर प्रचंड रागवावयास सुरुवात केली.आता पावसाळा येत आहे घरी बाबा एकटेच आहेत मग शेती साठी ट्रक्टर लागणार आहे मग तुझ्या बाबा ला ४ लाख पैसे दे म्हणव नाहीतर तुला येवून घेऊन जा, त्यावर प्रज्ञा ने हुंडा दिले न बाबांनी सर्व मग आता कशाचे मागत आहात? यावर मनोहर रागवून, तू माझ्याशी उलट बोलते काळे!!!!तुझी एवढी हिम्मत म्हणत मारायला सुरुवात केली.सासू - सासरे दारातून पाहत होते, आपल्या पोराला स्त्री वर हात उचलायचा नसतो हे सांगण्या ऐवजी मजा घेत होते व त्यात आणखी साद घालत होते, असली पांढऱ्या पायाची असेल म्हणून आम्हाला वाटल नव्हत?
घरच आयत बसून खात आहे आन बापा कडून काही माग म्हटलं कि नकोत्याने उलट बोलत आहे, काळी कुलेटी कुठली...!!!
हे सर्व प्रज्ञा पांघरुणात पडून रडत - रडत ऐकत होती, आता बाबा ला लग्न मोडा किंवा पैसे द्या असं कोणत्या तोन्दाने मागाव म्हणून ती आणखी हुंदके देत रडत होती. शेवटी या रोजच्या जुल्माला एकच उपाय म्हणून ती घर सोडण्याचा निर्णय घेतली. रात्री सर्व जन जेवण करून झोपले असता अनामत उठून हि घराबाहेर पडली, व चालता चालता पावलांनी विचार करू लागली....,
लग्न लाबले बाबांनी मी राणी बनून
राहील म्हणून,
छळ केले माझा मी सून आहे म्हणून,
नवर्याने मारलं मला मी बायको आहे म्हणून,
म्हणत आहेत आमच्या जीवावर जगत आहेस म्हणून,
काळी - कुलेटी, पांढऱ्या पायाची म्हणत आहेत मला
मी त्यांना पैसे आणून देत नाही म्हणून,
समाज स्वीकारणार नाही आता मला मी घर सोडलं म्हणून....
Subscribe to:
Post Comments (Atom)
अलविदा मनीषा (भाग १० )
मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...
No comments:
Post a Comment