नाऱ्या ला शांत करत असताना मी चिडलेलं पाहुन भाऊ ने विचारलं ? अरे एवढ काय चिडतोस त्यावर. तो फक्त मजाक करतोय न. मी थोड सावध घेत शांत झालो,पण नाऱ्या माझ्याक्ड पाहून वेगळच तोंड करत म्हणाला,सांगू का? आssss,आ.... मी परत त्याला ओरडू लागलो.मग मला थांबवत भाऊ ने नाऱ्या ला सांग रे म्हणल व पण मी नाऱ्या ला धमकावत होतो.मला भाऊ अडवत,तू सांग नाऱ्या मी आहे बोल तू....काही नाही भाऊ,हे सदाच असं करत. दहावी ला असताना पास झाल्यावर आयटीआय कराव म्हणल तर म्हणल पुढी शिकणारच नाही व त्या सायलीने ११ वी १२ कर म्हटलं की लगे तयार झाल बघ...व मला पण सोबत घ्याला लावलं अडमिशन,भाऊ नाऱ्या ला थांबवत,काय म्हणाला तू सायली!! भाऊ हसत माझ्याकडे पाहिलं व प्रश्नार्थक रित्या विचारणार इतक्यात मी नाऱ्या चल मी चलतो....म्हणत तेथून पळ काढली. भाऊ मला थांब म्हणत होता,पण त्याच्या प्रश्नांना कोण उत्तर द्याव म्हणून मी पळ काढली.
घरी येऊन आई ला अग मी खरच पास झालो म्हण, आई उद्गारली शाळेला न जाता ??? हो य आताच पवन भाऊ ला विचारून आलो.हुं मग आता काही काम करणार कि नाही ? कि आणि बसूनच खाणार ? आजोबा मागून ओरडले. मी काही बोलणार एवढ्यात आणखी एक शब्द टाकले,जा तिथ ढोर उपाशी आहेत. पाणी बिनी पाजव जा बर पटशी.. म्हणत आजोबांनी मला शेताला धाडलं.
दुसऱ्या दिवशी गावात फिरत असताना पवन भाऊ अचानक भेटला,मला आता पळताही येत नव्हत,थोड चोरुनच पाहून पाहिलं नसल्यासारखं करत मी पुढे जाऊ लागलो. त्याने अचानक मग ,ऐ सायली म्हणून हाक मारली.....मी वेगाने मागे वळून भाऊ ला शांत केलो. त्यावर त्याने बसण्यास सांगितलं व तू सायली नावाने एवढ का चीडतोयास? खर सांग काय आहे? मी कोणाला नाही सांगत म्हणत तो मला विचारण्याचा प्रयत्न करू लागला.मग मी एक एक शब्द फोडत,काही नाही भाऊ ती माझ्या वर्गातली आहे एवढच. भाऊ ला मनासारखं उत्तर न मिळाल्याने मग नाऱ्या पण तुझ्याच वर्गातला न, मग तो का चिडत नाही रे तिच्या नावाने ? खर- खर काय ते सांग नाही तर तुला सायलीच म्हणून गाव भर करेन बघ.हे नाऱ्या त्यन उग काय पण म्हनतेत भाऊ,तीच न माझ हजरी क्रमांक लागून आहे न,उग मला चीडवतेत हे,...
पण नाऱ्या तर काल वेगळच काय सांगत होत मला, दहावी मधल...
ऐ नाही भाऊ काही,सांग आता लवकर सांग....,
नववी - दहावीत होतो न तेव्हा मी तिला खूप बोलायचं,रोज शाळेला जाताना तिच्या घरापासून जाऊन तिच्या सोबत बोलत जात होतो, मग मला समजल नाही कि कधी तिच्याबद्दल वेगळ्या भावना मनात जागृत झाल्या. मग तेव्हा पासून तर जास्तच बोलत होतो. व तिला बोलल कि एकदम ख़ुशी व्हायची. मग हे मी एकदा नाऱ्या ला सांगीतलो.तर त्याने मग मला म्हटल कि खर ती तुलाच जास्त बोलते मग तू तिला विचार तर? मी विचारायचं ठरवलो पण हिम्मत व्हायची नाही,म्हणून मग कविता लिहायचो व शाळेला जाताना तिला वाचायला द्यायचो. ती हि खूप भारी म्हणून मला आणखी प्रोत्साहन द्यायची. पण मनातून होकार द्यायची कि नाही हे कळायचं नाही. पण मग दहावी च्या परीक्षे पुढे - पुढे तिने बोलन कमी केल,म्हणजे शाळेला आमच्या सोबत वगैरे येत नसे. मग मला पण थोड राग आला व मी पण तिच्याशी बोलन बंद केल. पण परीक्षेच्या एक दिवस आधी हॉल - तिकीट घ्यायला शाळेत गेलो होतो तर तेव्हा बोलली. म्हणली मला बोलणं का बंद केल? मी म्हटलं मग तू पण बोलत नव्हतीस न, शाळेला पण सोबत येत नव्हतीस,म्हणून जाऊदे ब म्हटलो... मग तिने हुं म्हणत माझ्या हातावर एक कागद ठेवला व निघून गेली.....
एवढ्यात तिथे केव्हा आजोबा आले समजलच नाही, आर असं निवांत बसायचे काम आमचे आहेत...जावा बघा शेताकड काहीतरी म्हणत बाबांनी मला तिथून उठवल, मी येतो पुन्हा म्हणत भाऊ पासून राम-राम घेतला.