पवन भाऊ,...आमचे १२ वी चे परीक्षा खरच न्हाईत का र ?
हे नाऱ्या म्हणत आहे_ आम्ही असच पास झालो,म्हणून अन ते खर आहे का ?
हो,रे तुम्ही पास झालात...
यावर मला खूष व्हाव कि रडावं हेच समजत नव्हत.रडायला म्हटलं तर या वर्षी काहीच अभ्यास केला नव्हता.तासिका झाल्या पण त्या मोबाईल वर मग आम्ही अगोदरच सांगून टाकल होत कि सर माझ्याकडे मोबाईल नाही...त्यामुळे त्याच विषयच नव्हता,यावरून पास होण हे अशक्य होत. मग खूष झालेलं बर,पण खूष व्हायचं तर सायली सोबत ची भेट हुकली. अगदी १० वी नंतर पुढे शाळा नको म्हणून मोठ्या भावाचा आदेश होता,तेव्हा मी सायली च्या नादा साठी १२ केली व ती आता संधीच हुकली. हा विचार करत मी पवन भाऊ च्या बाजूलाच शांत बसलो होतो.
७ वी मध्ये असताना, तिची नी माझी ओळख खेळाच्या तासात झालेली. आम्ही खो - खो खेळत होतो.ती जेव्हा मला खो देण्यास झुकली तेव्हा मी अचानक पुढे पळण्याचा प्रयत्न केला व ओठांवर पडलो. सर्व जन येऊन उठवले व जास्त लागल नाही न याची खात्री करत होते. पण ओठांवर पडल्यामुळे माझ्या ओठांतून रक्त वाहत होत. तेव्हा सर जवळ आले व काही होत नाही,हळद लाव त्यावर म्हणत...नाऱ्या किचन मधून हळद आन बर म्हणत आदेश दिला.तेवढ्यात नाऱ्या जाऊन हि आला व सर बाई नी त्याला कुलूप लावून घरला गेल्या. मग रे हळद आता कुठ भेटेल....यावर हळूच सायली म्हणाली_सर मी याला माझ्या घरी घेऊन जाऊ का ? माझ घर जवळच आहे न.त्यावर सरांनी होकार दिला.सायली व नाऱ्या दोघे जाऊन आमचे दफ्तर घेऊन आले व आम्ही पाठीवर अडकून निघालो सायली च्या घरा...
घरी तिची आई एकटीच होती.आम्हाला पाहून ती अचानक अचाम्भून गेली व ,सायली का झाल ग एवध्या लवकर कसकाय शाळेतून घरी आलीस. त्यावर सायली आई ला समजावून सांगू लागली,आई हा आता शाळेत खेळत असताना पडला मग त्याला हळद लावायची म्हणून घरी घेऊन आले... म्हणत ती आत गेली व दफ्तर ठेवून पाणी देत बाहेर आली. मी ओठावर व तोंडावर पाणी फिरवून आत गेलो. बसायला खुर्ची देत ती परत आत गेली व हळद घेऊन आली. तोवर आई आमच्या सोबत बोलत होती. तुम्ही कोणाचे नातू आहात वगैरे यावर चर्चा चालली होती. तेवढ्यात सायली हळद घेऊन आली व मला लावण्यास दिली.मग तोपर्यंत रक्त अगदीच थांबलेलं होत. मग सायली हि आमच्या सोबत चर्चेत सहभागी झाली. आम्ही थोडावेळ बसून आमची बस लागते म्हणत निघालो.
पुढे असच,सायली सोबत ची मैत्री वाढत गेली. कधी काही अचानक काम पडले असता तिच्या घरी जायचं,अथवा ती शाळेत का आली नाही यासाठी.केव्हा स्वाध्याय पुस्तिकेसाठी तर केव्हा सहली साठी.पण या हि पेक्षा महत्वाच म्हणजे आमचे हजेरी क्रमांक_ मागे पुढे असल्याने आमची मैत्री आणखीन घट्ट झालेली होती. सातवी,आठवी,नववी आम्ही मजेत काढली. पुढे दहावी बोर्ड, मग आमच सेंटर दुसऱ्या गावी होत,यासाठी थोड मनात धाकधूक होतीच पण तिथेही आम्ही एकाच वर्गात यायचो त्यामुळे त्या हि परीक्षेची भीती गेली व दहावी पास आम्ही झालो.
दहावीचे मार्क मेमो आणि टीसी घेण्यासाठी गेलो असता सायली च्या घरी आवर्जून गेलो,तेव्हा तिला सांगितलं मी तर पुढे नाही बा शिकणार !! भावाने म्हटलं कुठेतरी कामाला ठेवतो म्हणून...त्यामुळे शिक्षण बंद. यावर सायली ने अरे तसं नको करू म्हणत मला १२ विच महत्व पटवून दिल. व मी होकारार्थी मान डोलावत घराबाहेर पडलो व घरी येऊन अन्ना ला मला बारावी काढायचं आहे म्हणून मागे लागलो.अन्ना ने हि मग परवानगी दिली. मग दुसऱ्या च दिवशी टीसी घेऊन मी व नाऱ्या सायली सोबत च्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतलो.
एवढी वेळ शांत बसलेला पाहून नाऱ्या व पवन भाऊ ने मला हलवलं.ऐ___काय झाल ? मी अचानक दचकून काय नाय. नाऱ्या - मग आता तर मानतो न मला, भाऊ मी सांगत होतो तर हे ऐकत नव्हत बघ...हे सदाच असं करत बघ.हो काय म्हणत मी उठलो,...व नाऱ्या ला शांत करू लागलो...
No comments:
Post a Comment