जय ने स्वतः चे ब्लड सेम्पल दिले व तो घरी न जाता हॉस्पिटल बाहेर च्या गार्डन मध्ये बसला. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते आता घरी मनीषा ला काय सांगायचे ? व कसे समजावयाचे ? मनीषा च का बळी पडली असणार या आजारास ?
एवढ्यात मोबाईल वाजला, मनीषा ने call केला होता,...
जय च्या डोळ्यातून अश्रू कोसळू लागले, काही क्षणा नंतर अश्रू पुसत त्याने call घेतला,
जय,कुठे आहेस तू ? आणखी काम झाल नाही का हॉस्पिटल मधले ? व काय म्हणाले रिपोर्ट पाहून ? मनीषा विचारत होती,
जय नॉर्मल होण्याचा प्रयत्न करून उत्तरला, अग मी हॉस्पिटल मधेच आहे येईन थोड्या वेळात, तू काळजी घे... म्हणत त्याने फोन ठेवला,
तो मग उठला व चालत घराकडे निघाला,
त्याची पाऊले आज सुन्न व जड होती आणि डोके पूर्णतः विचारांनी भरलेले होते. पण तरी तो चालत होता, घरा जवळ येऊन त्याने निर्धार केला कि आपण मनीषा ला आज जे घडले त्याबाबत सांगायचे नाही. त्याने डोळे पुसले व घरा मध्ये जाण्यासाठी गेट काढला. गेट चा आवाज ऐकून मनीषा दार उघडून बाहेर आली. दोघे हि एकमेकांकडे पाहून प्रेमळ स्मित हस्य दिले. त्यानंतर मनीषा ने जय च्या हाता वर टोवेल सोपवलं व आत निघून गेली.
जय हात, पाय धुवून मनीषा च्या शेजारी तो हि जाऊन बसला. त्याच्या मनात खूप विचारांचा गोंधळ होता पण तो शांत अगदी बसून मनीषा ला निरखून पाहत,प्रेम व्यक्त करत होता.
मनीषा ला हे खटकल व तिने विचारलं, आज तू एवढा शांत कस काय झालास रे ?एरवी तर खूप बडबड करतोस न ? काय म्हणाले का डॉक्टर नी ? अरे, हा सांग न,काय म्हणाले डॉक्टर रिपोर्ट पाहून....
काही नाही ग आज थोड हॉस्पिटल मध्ये जाण्याने थकलोय बघ, व आज रिपोर्ट अभ्यास करून डॉक्टर उद्या सांगतीलच, त्यामुळे रिपोर्ट ची चिंता सोड आता मला भूक लागली आहे जेवण करूया.
जय, अरे मी आत्ताच उठले थोड्या वेळा पूर्वी,त्यामुळे स्वयंपाक मी केला नाही.चल ना आत, मी पोळ्या टाकते तू भाजी चिरण्यात मदत कर मला,
ठीक आहे, चल म्हणत दोघे हि उठले,
जेवण वगैरे करून जय tv पाहत बसला,मनीषा भांडे आणि स्वयंपाक घर साफ करत होती. जय ने थोडा वेळ मनीषा सोबत घालवल्याने त्याचे मन थोडेशे हलके झाले होते. एवढ्यात मनीषा हि येऊन सोबत बसली.
आई, बाबांचा आला होता का फोन? मनीषा विचारत होती. नाही न, व मी पण हॉस्पिटल मध्ये असल्याने त्यांना केलो नाही, आता वेळ हि झाला आहे, उद्याच बोलू.
कदाचित आपल्याला उद्याही हॉस्पिटल जाव लागेल त्यामुळे आता आपल्याला झोपायला हव म्हणत जय उठला,
ठीक आहे मी एवढ सिरीयल पाहून झोपते म्हणत मनीषा तेथेच बसली.
जय बेड वर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण झोप लागत नव्हती. तो विचार करत होता. उद्या मनीषा ला एड्स आहे म्हणून कसे सांगायचे, कि बहुना सांगू च नये. नाही नाही तिला हि प्रकाशात आणायला हवे.तो मनाशीच प्रश्न उत्तरे विचारत व देत होता. यामुळे त्याला डोळे मिटून हि झोप लागत नव्हती.
एवढ्यात tv बंद करून मनीषा रूम मध्ये आली. तिने जय चे डोळे हालचाल करत असलेले पाहून, जय नक्की काय झालय सांगशील का ? मला माहित आहे तू झोपला नाहीस. त्यामुळे उठ, बोलल्याने मन हलक होत रे, व मी तुझी अर्धांगिनी आहे, तू माझ्या पासून एवढ काय लपवतोस,
दुपारी call केला होता, तेव्हाही बोलला नाहीस,
आई बाबांना नेहमी call करणारा आज केला नाहीस,
सतत बड-बड करणारा तू आज शांतच आहेस,
उठ बोल माझ्याशी,
हे ऐकून जय उठला व मनीषा ला एकदम मिठी मारून रडू लागला,
cont....