Monday, January 24, 2022

रिपोर्ट (भाग 1)

          मनीषा ला काही दिवसांपासून अचानक थकवा जाणवू लागला. व ती सतत आजारी राहू लागली. त्यामुळे ती सारखे अंथरुणातच पडून राहत होती. तिच्या मदतीला म्हणून जय ने हि आठवडा भरासाठी ऑफिस मधून सुट्टी घेतली. व जय ने मनीषा ला हॉस्पिटल मध्ये आणले होते. डॉक्टरांनी मनीषा च्या सर्व चाचण्या केल्या.आता दोघे हि रिपोर्ट काय येईल याची वाट पाहत बसले होते.एवढ्यात जय ला ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. जय ने मनीषा ला धीर देत मी जाऊन येतो म्हणत तो ऑफिस कडे निघाला. 

          ऑफिस मध्ये गेल्या नंतर डॉक्टरांनी जय ला बसण्यास सांगितले. जय खुर्सी मागे घेऊन बसला. डॉक्टरांनी त्याच्या पुढे फाइल सरकवत प्रश्न केला. तुम्ही व पेशंट मनीषा, तुम्ही केव्हा पासून सोबत आहात ? किंवा तुमची भेट केव्हा झाली ? 

असा वेगळाच प्रश्न ऐकून जय थोडा घाबरला,... सर काही सिरीयस नाही न ? जय उत्तरला,

नाही,नाही मला थोड प्रश्नांची उत्तरे द्या मी सांगेन च न,

माझी व मनीषाची भेट 2 वर्ष पूर्वीच झालेली. ती माझ्या नातेवाईक मधूनच आहे.व मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा आमच लग्न जमल व काही दिवसांनी च आम्ही लग्न हि केल.त्यामुळे गेली 2 वर्ष आम्ही सोबत आहोत, जय म्हणाला

ok, व मनीषा वारंवार आजारी केव्हा पासून राहत आहे?

सहा महिन्यापूर्वी तिला टाय-फोइड झालेला होता मग त्यातून ती बरी झाली,पण काही दिवसांनी ती थकवा जाणवत आहे म्हणत अचानक आजारी राहू लागली.

ok, मग तेव्हा केलेल्या ब्लड टेस्ट च्या वगैरे रिपोर्ट असतील तर देता का ? संदर्भ साठी हवे आहेत , डॉक्टर विचारले.

हो सर, मी घरी गेल्या नंतर तुम्हाला आणून देईन,पण सध्या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं आहे सर...?

या रिपोर्ट वरून तर सर्व नॉर्मल असल्याचे दिसत आहे पण इम्युनोग्लोबिन्स ची संख्या घटते आहे,त्यामुळे भयंकर आजार विषयीची शंका वाटत आहे. त्यामुळे तुम्ही पूर्वी केलेल्या ब्लड टेस्ट ची पण रिपोर्ट आणून द्या मी त्यावर अभ्यास करून आपणास सांगतो.

यामुळे सध्या घाबरून जाण्यासारखे काहीच कारण नाहीय antibodies अन्य कारणाने हि कमी होऊ शकतात. फक्त तुम्ही त्यांची योग्य काळजी घ्या.... ठीक आहे सर, म्हणत जय खुर्सी मागे सरकवत उठला व दरवाजा च्या दिशेने निघाला.बाहेर येऊन त्याने डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतली व मनीषा ला घेऊन तो घरी जाण्यास निघाला.

 घरी येऊन जय ने मनीषाला औषधे देऊन तिला झोपवले व ती फाईल घेऊन परत डॉक्टर कडे निघाला. 

डॉक्टर राउंड वर गेले होते त्यामुळे तो बाहेर बसून त्यांची वाट पाहत होता. इतक्यात डॉक्टर आले जय ला पाहून त्यांनी मी तुम्हालाच call करणार होतो बरे झाल तुम्ही आलात. 

का ? का डॉक्टर ? काय झाले...

तुम्ही मध्ये या आपण बोलू म्हणत दोघे आत मध्ये गेले. जय व डॉक्टर बसले,

आय थिंक तुम्ही पूर्वीची रिपोर्ट आणली आहात बघू म्हणत डॉक्टरांनी रिपोर्ट वाचून पाहिली,

 जय आता तुम्हाला थोड स्वतः ला व मनीषाला सांभाळाव लागेल, म्हणत डॉक्टरांनी जय च्या समोर एक रिपोर्ट सरकावला.

मला थोडीशी शंका होती त्यामुळे मी अन्य टेस्ट साठी हि ब्लड दिल होत व त्यातील HIV reactive चा रिपोर्ट हा positive आलेला आहे. व तुमच्या सहा महिन्या पूर्वी च्या  रिपोर्ट मध्ये पण इम्युनोग्लोबिन्स ची संख्या घटते आहे, त्यामुळे मनीषा पूर्वीच HIV ने ग्रस्त होती असं आमच मत आहे.

जय ला धक्का बसला, डोळ्यात पाणी आले पण डॉक्टरांनी धीर दिला,

जय स्वताला सांभाळा,....

आम्हाला तुमची व तुमच्या कुटुंबियांची पण चाचणी करायला हवी, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सेम्प्ल आमच्याकडे जमा करा... व मनीषा ची योग्य ती काळजी घ्या,व काहीही झाले अथवा अडचण आली तर मला संपर्क करा,

मी सेम्पल जमा करतो सर लवकर म्हणत तो बाहेर पडला,

त्याचे डोके पूर्णतः जड झाले होते, घरी काय म्हणावे, असे माझ्याच का नशिबी झाले ? असे नाना विध प्रश्न त्याला पडले होते....


No comments:

Post a Comment

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...