Monday, May 24, 2021

मैत्रीण..

 मनु च्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या नंतर प्रेमा माहेरी व मनु मामा कडे जाण्याचा अट्टहास करत होते त्यामुळे त्यांना रेल्वे ने पाठवण्यासाठी रेल्वे स्टेशन वर गेलो.ट्रेन थोडी लेट आली व १० वाजले मग त्यांना योग्य त्या बोगी मध्ये व आरक्षित सीट वरती बसून मनु चा पापा घेत त्यांना पाठवणी करून घराकडे येण्यास वळलो, रेल्वे स्टेशन च्या बाहेर पडताच मोबाईल वर फेसबुक ची नोटीफिकेशन आली.मोबाईल हातात होता व मी घाईत त्यामुळे त्याकडे लक्ष न देता स्किप करून पार्किंग मध्ये जाऊन गाडी काढलो.सकाळी ऑफिस ला लवकर जायचं या साठी आज अलार्म लावून झोपावं लागेल कारण प्रेमा घरी नाही न.. हे असे उद्याच्या दिवसाची रण नीती मी करत होतो.शेवटी घर आल. गाडी मध्ये घेऊन गेट वगैरे लावलो.नंतर झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेलो. व अलार्म लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला. होम पेज ओपेन केले असता फेसबुक ची नोतीफिकेषण आलेली दिसली.ती काय आहे हे पाहण्यासाठी फेसबुक ओपन केलो.नोतीफिकेषण म्हणजे मला एक फ्रेंड सजेशन आलेली कि तुमच्या contact लिस्ट मध्ये असणारी माधुरी हि फेसबुक वरती नुकतीच आलेली आहे व तुम्ही तिच्याशी मैत्री करू इच्छिता का ? माधुरी हे नाव ऐकताच थोडा मनामध्ये थरकाप सारखा झाला. वाटल हे कस काय झाल.पुन्हा contact लिस्ट चेक केली तर खरच त्यात 💓 माधुरी 💓नाव दिसलं.डोळ्यातील व डोक्यातील झोप पूर्णतःनाहीशी झाली.इतक्यात मोबाईल वर रिंग आली मी वर्तमानात आलो,प्रेमा चा कॉल होता...मी उचलून बोलू लागलो,ती विचारत होती घरी पोहोचलात का?जर भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये डब्बा ठेवला आहे तुम्ही खाऊन घ्या. मी तीच बोलन थांबवत मनु कुठे आहे म्हटलो त्यावर ती तेव्हा च  झोपी गेली असं प्रेमा म्हणाली, त्यावर मी पण मीही माझी काळजी नक्की घेईन म्हणत तिला गुड नाईट म्हणून फोन ठेवला.नंतर मी किचन मध्ये जाऊन फ्रीज मधून पिण्यास पाणी बॉटल  घेतलो व हातात बॉटल च टोपण काढत बेडरूम कडे वळलो,पण मनामध्ये विचार वेगळाच चालू होता. 

माधुरी माझ्या कॉलेज मधील माझी जवळची मैत्रीण……

       आमची ओळख शिष्यवृत्ती फोर्म भरण्यापासून झालेली, मग पुढे तीच ओळख हळू हळू एक चांगल्या मैत्री मध्ये रुपांतर झाली.मग आमचे मेसेज मध्ये होणारी चाटिंग अधिकच वाढायला लागली, आम्ही सर्व भावना एकमेकांना शेअर करत असो.यातच दोन वर्ष उलटून गेली,शेवटच्या वर्षी पुढील प्लान काय म्हटलं असता आमच्या पुढे काही नव्हत मग वाटल CA कराव व दोघांनी पण तयारी सुरुवात केली.पुढे कॉलेज आमच संपल शेवटच्या परीक्षा हि आम्ही उत्तीर्ण झालो.मग आता आम्हाला CA साठी फुल वेळ मिळालेला होता त्यातच तयारी करत असताना एका नामवंत कंपनी मध्ये ऑडीट करण्यासंबंधी जाहिरात होती,आम्ही नक्कीच CA उत्तीर्ण नसलो तरी अनुभव साठी दोघांनी मुलाखत दिली.त्यात माझ मात्र सेलेक्षण झाल. तेथून पुढे रोज नवीन नवीन कंपनी चे ऑडीट करण्यात मी व्यस्त झालो व त्यावर्षीचा निकाल फेल आला.तरीही धीर सोडून द्यायचा नसतो म्हणत आम्ही पुन तयारीला लागलो पण आता माधुरी सोबतचा सहवास आणि संपर्क दोन्ही कमी झालेलं. एके दिवशी तिचा मेसेज आला माझ लग्न ठरलंय,लग्नाला नक्की या CA साहेब,..... का?काय माहिती हि बातमी ऐकून थोड मी अस्वस्थ झालो.पण तरी तिला खूप भारी!!!!मी लग्नाला नक्की येईन म्हणून मेसेज पाठवलो.

     लागलीच मी CA उत्तीर्ण झालो,हि आनंदाची बातमी माधुरी सोबत शेअर करावी म्हणून तिला कॉल केला पण तो बंद आला, सर्वाना तिच्या नवीन नंबर ची विचारणा केली असता कोणाकडेही मिळाल नाही, थोडस मनाला सर्व जिंकून हरल्याचा भास झाला.ती कुठे,कशी आहे हे काहीच माहिती नव्हत,मग कशीतरी मनाची समजूत काढली व  पुन्हा त्या कंपनी मध्ये माझी जॉब पेर्मनंत झाली, मीही त्या कामा मध्ये व्यस्त झालो.रोज नवीन नवीन स्थळ वडिलांकडे येत असत, पण माझी कसलीच रुची त्यात नव्हती.शेवटी प्रेमा सोबत लगीन गाठ बांधली गेली.पुढे 2 वर्ष म्हणताच मनू जन्माला आली व माझ्याही मनातून माधुरी हे नाव धूळ खात कुठतरी पडल, पण आज अचानक आलेल्या नोतीफिकेषण ने परत भावना उफाळून येत होत्या….

           बेड वर पडल्या पडल्या हे सर्व विचार करत होतो, खरच अगदी मला समजून घेणारी व मला योग्य दिशा दाखवणारी अशी माझी मैत्रीण ती होती,फक्त एकच वाटत होत मरे पर्यंत आमची सोबत असावी, नवरा- बायको नसलो तरी राधा कृष्ण सारखी प्रीत असावी, जमल नाही कॉल वर बोलायला तरी आठवणीत सदैव असावी,आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करावी,नात्यामधून मैत्री व प्रेमाचा अर्थ कलावा,जमल कधी तर एकमेकांना गिफ्ट पाठवाव नाहीच तर वाढदिवसा निमित्त दान नक्की कराव,शेकडो किलोमीटर दूर असूनही मनाने जवळ असावे,प्रेमाच्या पलीकडेही आपल नात असाव,माझे सर्व सिक्रेट्स तू मनामध्ये ठेवाव  अशी हि आपली मैत्री तू हृदयात जपावस,जमलंच तर आयुष्यात एकदा तरी आपली भेट घडावी,त्या दिवशी लंच कॉफी आपण एकत्र घ्यावी,आपल्या नात्यावर कुठलाही डाग नसावा,चरित्र जपण्यासाठी आपण दोघांनीही प्रयत्न करावा,माझ्या आयुष्यातील सखी सोबती तूच असावीस_हे देवा, पुढल्या जन्मी मात्र तीच माझी अर्धांगिनी असावी…...


2 comments:

  1. Wonderful,super yaar.....bt is it true story

    ReplyDelete
    Replies
    1. please read second part https://npthaughts.blogspot.com/2021/05/blog-post_94.html
      you will get all answers of questions
      thanks

      Delete

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...