Wednesday, May 26, 2021

द्विधा

 बायको_चा पुढील भाग 

मणू आणि प्रेमा च्या सानिध्यात राहून व त्यांचे माझ्यावरील प्रेम याने मी लवकर ठीक होऊन पूर्ववत ऑफिस जाण्यास एकदम तयार झालो. आज खूप दिवसांनी ऑफिस चा पहिला दिवस होता. गाडी मधून उतरून ऑफिस च्या दिशेने जस - जस जात होतो तसे सर्व कर्मचारी आदराने विश करत होते. सर्वांचे सुमने स्वीकारत मी डेस्क कडे वळलो. आज सर्व काम अतिशय उत्सुर्फपणे पार पाडत होतो.राहिलेल्या पेंडिंग फाइल्स सर्व निपटून मी घराकडे जाण्यास निघालो. खूप दिवसांनी आज बाहेर आल्याने प्रेमा साठी काहीतरी न्यावे, या विचाराने मी काय न्यावे  विचार करत होतो.स्त्रियांना काय आवडेल याची कल्पना नव्हती पण खूप दिवस झाले खरेदी नाही केली म्हणत साडी घेण्याच ठरविलो.ऑफिस च्या जवळच शॉप होत.त्यामुळे चालतच गेलो व तेथील कर्मचारी ना सांगितलं.त्या विचारत होत्या रंग कसा व प्रकार वगैरे...?मला त्याबद्दल जास्त काही माहिती नसल्याने पण अगदीच सामान्य प्रमाणे मोवी मध्ये पाहिलेलं आठवून लाल रंग सांगितला.त्यांनी अगदी माझ्या समोर ढीग लावला व वर्णन करत होते,ते लक्ष न देता मी एक साडी पसंत केली व अगदीच गिफ्ट करून घेतली.व ऑफिस च्या दिशेने येऊन गाडी द्वारे घराकडे निघालो. 

         घरी आल्यानंतर प्रेमा ला सरप्राइस देण्याच्या हेतूने, तोपर्यंत गिफ्ट bag study Room मध्ये ठेवण्यासाठी मी study room कडे वळलो.आत प्रवेश करताच मी सरप्राइस झालो.PC वर प्रेमा आणि मणू काहीतर करत होते. मग येथे जमणार नाही म्हणत मी उलट्या पावलांनी मागे आलो व बेडरूम मध्ये जाऊन लपवलो.नंतर फ्रेश होऊन मनु सोबत खेळण्यासाठी study room मध्ये गेलो. प्रेमा ने मला पाहताच आलात तुम्ही म्हणत PC बंद केला व बाहेर निघून गेली. रात्री ९ दरम्यान जेवण झाल,प्रेमा मणू ला झोपवून room मध्ये आली. त्यानंतर मी प्रेमा कडे हळूच गिफ्ट समोर करणार इतक्यात तिने म्हटलं,मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे,खर खर व नक्की सांगा हा!! व रागावू नका please,मी सहज विचारत आहे.ही शब्दांची जाळी मला समजून येत नव्हती. पण मनात प्रेम भावना असल्याने मी, नक्की बोल न काय झाले...., काय विचारायचं आहे.....त्यावर तिने थोड घाबरत व अगदी हळू दबक्या आवाजात,अहो आज मनु व मी PC वर बसलो होतो न तेव्हा.....,हे ऐकून थोड माझ्या चेहऱ्याचा रंग उडत चालला होता.माझ्या हाता मध्ये असणार गिफ्ट मी हळूच मागे सरकवत,हा बोल न मग काय झाले.....,अहो तुमच्या कॉलेज दरम्यान चे वगैरे फोटो पाहीले. मी एवढंच न.... मग त्यात काय झाल ग..., अहो नाही त्यात आणखी हि काही होत ज्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं होत....त्या फोतोंसोबत काही स्क्रीन_शॉट पण होत्या. आता मात्र मी निशब्द झालो, मला समजून आल कि हिने माधुरी सोबत बोललेलं पाहिलं आहे.माझी समाधी तोडत तिने पुढे बोलण्यास सुरुवात केली.त्यात तुम्ही माधुरी ला बोललेलं आहे,अहो खर सांगा न, माधुरी वर तुम्ही प्रेम करता का ?

        सर्व शब्द मला निशब्द करत होते. आकर्षण च्या भावनेतून मी सर्व स्क्रीनशॉट जमा केल्या होत्या.व PC मध्ये थोड जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी ती हार्ड डिस्क लावलो खर पण ती काढू शकलो नाही. प्रेमा ला विश्वासात घेत, अग ते खर आहे कि मी माधुरी ला बोललो व कॉलेज मध्ये असताना ची ती माझी मैत्रीण पण तीच लग्न झालेलं आहे व ते सहज खूप दिवसांनी म्हणून फोर्मल बोललो....पण मग तुम्ही 💓माधुरी💓 या नावाने फोटोस सेव केलेल्या आहेत ते, अग अगदी खर सांगितलं तर मी तिच्याप्रती आकर्षित होतो हे सत्य पण आता नाहीय,मला समजून आलेलं आहे कि मी चूक करतोय. 

         तू व मनु असताना मी बाहेर प्रेम शोधन हे अन्याय आहे.तुम्ही माझ्या प्रत्येक सुख दुख मध्ये कसोशीने सोबत आहात व मी जे शक्य नाही त्या गोष्टीच्या मागे लागलेलो होतो. खर पाहिलं तर तुझ्या मुळे आज मी एवढा सुखी आहे,कारण तू माझ्यावर प्रेम करतेस.अगदीच मी कसाही वागलो तर माझ्यावर प्रेम करत मला सांभाळून घेतेस. तुला अगदीच हक्क आहे ग माझ्यावर रागवायचा पण माधुरी फक्त आकर्षण होत,जे मला समजण्यास थोडा उशीर झाला..पण समजून नक्की आल.,

मग ऑफिस मध्ये तर तुम्ही बॉस आहात तेव्हा ऑफिस....त्यावर तिचे शब्द थांबवत म्हणलो,तसं काहीच नाही व यापुढे नक्कीच होणार नाही...तो असलेला data मी आताच delet करून येतो म्हणत मी ताडकन उठलो व study room कढे निघालो.प्रेमा मात्र एक वेगळ्याच द्विधे मध्ये होती...ती तिथेच बसून विचार करत होती,तिला खुश व्हायचे कि नाराजी व्यक्त करावी समजत नव्हते. मी सर्व फाइल्स एकदाच select करून delet button दाबल,त्या फाइल्स delet होण्यास थोडा वेळ लागणार होता तेव्हा मनात सुचल,

ऑफिस मधले नसून 

फेसबुक वरचे माझे प्रेम....

तिचे स्टोरी पाहण्याचा आणि सेव करणे 

हा माझा नित्य नेम ,

असं माझ फेसबुक वरील एकतर्फी प्रेम....  

1 comment:

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...