आकर्षण व प्रेम_अंतिम भाग
PC मधून व मनातून माझ्या जीवनातील एक अनावश्यक पण त्रासदायक पार्ट मी delet करून प्रेमा कडे परतलो.परतत असताना मनावरील ओझ कमी झाल्या सारख वाटत होत.म्हणजे मी खुश होतो नव्याने जीवन सुरुवात करण्यासाठी.त्यातच मी room मध्ये आलो,पण प्रेमा आणखी कसल्यातरी द्विधेत असल्याच मला जाणवलं.तिच्या जवळ जाऊन,अग मी ते सर्व delet केलो आहे.त्यामुळे तू आता त्याबाबत चिंता नकोस करू.व मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. बाकी कोणीही माझ्या जीवनात नाहीय....विश्वास ठेव,.हे ऐकताच तिचे डोळे पाणावले. तिला समजवत धीर देण्याचा प्रयत्न मी करत होतो.तेव्हा तुम्हाला मला पण काहीतरी सांगायचं आहे....म्हणत ती भावूक झाली होती. अग बोल न,रडतेस कशाला मग,नाही पण तुम्ही ते ऐकल्या नंतर मला माफ करा व रागावू नका...हो ग,मी नाही रागावणार...उलट तूच मला रागवू शकते झालेल्या कृत्यावर...बर सांग मी ऐकत आहे...,
आपल लग्न होण्याच्या आधी म्हणजे कॉलेज च्या शेवटच्या वर्षात,असं काही झाल होत ज्यामुळे बाबांनी माझ पुढील शिक्षण बंद करून लग्न लावून देण्याच ठरवलं.मी कुतुहूलपूर्वक पाहत होतो,मला थोडस ती काय म्हणत आहे यावर विश्वास बसत नव्हता.पण तिला धीर देत मी शांत पने ऐकत होतो.
एके दिवशी रात्री आम्ही सर्व जन जेवण करुन बोलत बसलो असता माझ्या मोबाईल वर call आला. तिथे सर्व जण बसले होते त्यामुळे मी थोड दूर वर येऊन ,हलो कोण बोलत आहात? एका १९-२० वर्षाच्या मुलाचा मला आवाज कानी आला.हलो,तुम्ही प्रेमा बोलताय ना..हो पण आपण कोण?हा मी बोय्स होस्टेल मधून बोलतोय,तुमचा नंबर होस्टेल मधील बाथरूम मध्ये लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे मी त्यासाठी फोन केलेला आहे कि हा नबर ज्या अर्थाने लिहिला गेलेला आहे,त्यासाठीच आहे अथवा नाही? हे ऐकताच मला (प्रेमा) पुढे काय बोलावे समजत नव्हते.पायाखालची जमीन नाहीशी झाली. पुढून आवाज येत होता,हलो,हलो ... मी सावध होत sorry,wrong no. म्हणून फोन पटकन ठेवून टाकला व रूम मध्ये जाऊन काय घडत आहे - हे खरे असेल का म्हणत विचार करू लागले.तेवढ्यात परत call आला,आता मात्र उचलण्याची भीती वाटत होती.त्यामुळे मी स्वीच ऑफ करून टाकला व बेड वर पडले.सकाळी आई ला हे सर्व सांगितलं व आई ने बाबांना. बाबांनी थोड रागवल,त्यामुळे म्हणत होतो मोबाईल नको म्हणून आता केल न,तोंड काळ.पण आई ने त्यांना समजावत अहो ती अगोदरच घाबरून गेलीय तुम्ही आणखी नका न ओरडू तिला.मी घरीच राहिले. बाबांनी मोबाईल चालू केला,चालू केल्या बरोबर,मेसेज वर मेसज आलेले.हे पाहून बाबा पण दंग झाले.मी तर शांत अगदी चित्त झाले. पुढे करायचं काय ? हा प्रश्न होता. मग बाबांनी पोलिसात कम्प्लैन करणे हेच योग्य होईल,म्हणून आम्ही पोलीस मध्ये गेलो. तिथे सर्व details दिल्या.समजल ते आमच्या कॉलेज च बॉय्स होस्टेल आहे.मग आम्ही ताबडतोब पोलिसांबरोबर होस्टेल गाठलो व तेथील वार्डन शी त्यावर चर्चा केली. व ज्या नंबर वरून call आलेला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.पण पुढील कार्यवाही मध्ये नाव जाईल म्हणून बाबांनी केस न करताच त्यांना धमक दिली.व पोलिसांनी हि वार्डन ला no. लिहील गेल्या संदर्भात सूचना केल्या व लवकरात लवकर त्यास नाहीस करा,अन्यथा परत आम्हाला याव लागेल.पण या सर्व मध्ये हा प्रश्न कायम होता तो म्हणजे असे कोणी केले? यावर पोलीस व बाबांनी होस्टेल मध्ये तुझा number असणारा कोण राहतो ?अशी विचारणा केली. त्यावर माझ्या वर्गातील होस्टेल मध्ये फक्त शेखर असतो. शेखर...नाव ऐकताच थोड मनामध्ये तिरस्कार व भीती निर्माण झाली.
शेखर हाच होता ज्याने मला अगदी आठवड्या पूर्वी प्रेमाची मागणी घालत होता.त्याचे प्रेम हे एकतर्फी होते. त्यामुळे मी त्यास स्पष्ट नकार देत त्याच्या प्रेमाची अपेक्षा भंग केली होती. warden नी इतक्यात शेखर ला बोलावून घेतले. पोलिसांनी धमक दिल्यानंतर त्याने याबाबत कबुली दिली व हे कृत्य त्याचेच असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आम्ही घरी निघून आलो. घरी आल्या नंतर बाबांनी माझ कॉलेज जान च बंद केल. व याच वर्षी तुझे लग्न लावून देईन म्हणत त्यांनी शोधाशोध चालू केली.लग्न मोडू नये व माझ्या चरित्र वर संशय येवू नये म्हणून मी व बाबांनी तुमच्या पासून हे सर्व लपवून ठेवलं.पण आज जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भूतकाळ सांगितलं तेव्हा मला राहवल नाही म्हणून मी बोलले...म्हणत ती आणखी रडू लागली.
हे सर्व मी अगदी शांत पणे ऐकून घेत होतो.आता मला समजत नव्हते कि यावर तिला कशा पद्धतीने सांभाळू,अग तू काळजी नको करू मी सोबत आहे. आता ते झालेलं सर्व विसर.तो तुझा भूतकाळ होता.व त्यावर मी आज निर्णय घेणार नाही. व तुझ चरित्र कसं यावर मी काहीच टिप्पणी करू शकत नाही.यामुळे तू व मी आपण दोघही आपला भूतकाळ आज पासून विसर्लेलाच बरा. म्हणत तिचे अश्रू पुसलो व तिला प्रेमाने बेड वरून उठवत डोळे झापण्यास सांगीतलो.व मी तिच्या पुढे आणलेली गिफ्ट सरकवत डोळे उघडण्यास सांगीतलो. ती रडत-हसत मला एकदम मिठी मारली.ThankYou ती मला व मी तिला I Love You म्हणत होतो. आज आमच्या मैत्रीची सुरुवात होत होती. आम्ही दोघांनी ठरवल यापुढे आपण पती - पत्नी न राहता मित्र आहोत.दोघांमध्ये कोणत्याही शंकेला अथवा अन्य व्यक्तीला कुठेही जागा नाही.आपल दोघांच हि हृदय हे फक्त आपल्या प्रेमानेच भरलेल असेल....
आज मन हलक करून व तिचा विश्वास जिंकून जगातील सर्वात खुश व्यक्ती मी झालेलो होतो.मला माझ विश्व मिळालेलं होत. जिच्या साठी मी मृगजळ सारख वावरत होतो ती माझी प्रेमा माझ खर प्रेम बनून माझ्याच सानिध्यात होती....
No comments:
Post a Comment