मैत्रीण_ चा पुढील भाग,
माधुरी च नाव घेताच पूर्ण इतिहास मला आठवत होता, कळत नकळत मी तिच्यावर प्रेम करत होतो, मला तिच्याशी एकदा तरी बोलायचं होत,....हे असे सर्व विचार डोक्यात चकरा घालत होते त्यामुळे झोप काही येतच नव्हती. मग मी थोड्या पूर्वीच्या फोटो पहाव म्हणून PC वर बसलो.प्रेमा ला याबद्दल काही माहिती नसाव किंवा तिला मी सांगितलं नव्हत त्यामुळे कोलेज जीवनातील वेगळी हार्ड डिस्क टाकून थोडे आठवणी ताज्या करत होतो,यातच दिवस उजाडत आला. ऑफिस मध्ये कॉल करून आजच शेडूल मागवलं,त्यानुसार थोडा वेळ मिळाला थोड झोपलो व रेडी होऊन ऑफिस ला निघालो. जाता जाता मनातून काही माधुरी बद्दलचे विचार मला सोडण्यास तयार नव्हते त्यामुळे मी फेसबुक मध्ये जाऊन तिला रिक्वेस्ट पाठवली व म्हटलं जर तिला ओळख असेल तर पाहू नाहीतर त्या विषयाला राम राम करू.
ऑफिस मध्ये आज काही जास्त काम नव्हत फक्त ऑडीट होऊन आलेल्या फाइल्स चेक करायच्या होत्या.मग त्या करत बसलो असता मोबाइल वायब्रेत झाला.प्रेमा चा कॉल होता.आता ऑफिस मध्ये जमणार नाही व कामात आहे यार्थाने त्यास मी पॉवर बटन दाबून परत चेक करत बसलो. काम झाल्यानंतर लंच टाइम मध्ये प्रेमाला बोललो,मणू तिथे एकदम शांत झालेली व मला पप्पा कडे वापस जायचं म्हणून हट्ट करत होती. मग प्रेमा ने जेवण वगैरे कस केलात म्हटली मी कॅन्टीन आहे तू नको काळजी करू मी काळजी घेतोय, तू तुझी व मणू ची काळजी घेत फोन ठेवलो. इवेनिंग मध्ये ऑफिस बंद झाल्यानंतर मी घरी निघालो. मनात अगदी माधुरी चा विचार होताच, ती काय म्हणेल,असेप्त करेल कि नाही? पुढे काय बोलू....मन या विचारांनी अगदीच भरून येत होत,पण आणखीन तरी तिने असेप्त केलेली नव्हती.घरी येऊन खिचडी घालून जेवणास बसतोच कि नोटीफिकेशन आली रिक्वेस्ट असेप्तेड.मी अगदीच ख़ुशी ने पागल झालो. ती हि ओनलाईन होती व आता मी पण,पण आमच्या पैकी चर्चा कोणी सुरुवात करत नव्हत. मग मीच पुढाकार घेत
me- hii
madhuri- hii
me- are kuthe aahes,khup divas jhale na bhetun, tujha tar ha call pn lagat navhata.
mdh- ho,are ha mobile mi ithech maheri thevun gelela hota,sasari mi tyanchach mobile use karate na,
me- are vva tu ghari aaleli ka
mdh- ho
me- kiti divas rahanar
mdh-are tyana kama nimitt MP la jav lagal aahe mg toparyant mi ithech aahe, te return aale ki janar aahe vapas
mdh- pn sadhya tu kuth aahes?
me-are mi CA jhalo na, mg sadhya transfer karun ghetloy HYD
mdh- khup lamb re gelas mg,
me- ho
mdh- mg kadhi yenar ikde v lagn jhal ki nahi...
me- yeil lavakarach
me- are mi aloch ha thod kam aahe...
लग्न झाल का ? विचाराल्य्ने मी गोंधळून गेलो तिला काय सांगायचं म्हणून शांत झालो. इतक्यात प्रेमा चा कॉल आला, तिला जेवत आहे म्हणत सर्व चर्चा उडवून लावत करतो आता उद्या सकाळी,खूप थकलोय म्हणत ठेवून टाकलो.
परत फेसबुक वर जाऊन तिला मेसेज चालू केला..आमचं चर्चा चांगलीच रंगली होती, कधी १२ वाजले व ती प्रत्येक वेळी चर्चा थांबवण्यासठी प्रयत्न करत होती आणि मी रिप्लाय देतच होतो शेवटी तिने Gn म्हणून ऑफलाईनगेली व मी पांघरुणात आज हि तिच्या मनात खरच मी असेल का ?
तिला एकदाच विचारव का ? अशा विचारांनी सुख भोगत होतो.सकाळी अगदीच अलार्म न लावता लवकर उठून अगोदर तिला मेसेज केला.हे असच चालू झाल. यामुळे कामा मध्ये लक्ष लागनास झाल. व भावना आता जास्त बळकट होत होत्या तिला एकदा विचाराव ती नक्कीच हो म्हणेल, जरी लग्न झालेलं असल तरी पाहता येईल. या विचारांनी मी हि अनिल कपूर,सलमान खान व गोविंदा अगदीच बनत चाललो होतो. मधेच या विचारांना व माझ्या भावनांना ब्रेक लावत प्रेमा आज वापस आली. यामुळे रोज रात्री माधुरी ला बोलत बसण्याच्या कार्यक्रमाला ब्रेक लागणार होता. मग प्रेमा ला काम करतोय म्हणत स्टडी रूम मध्ये जाऊन PC वरून बोलू लागलो. ती अगदीच जवळ येत गेली व माझ्या भावना आता एकदम तीक्ष्ण स्वरूप धारण करत होत्या. तिचा रिप्लाय आला नसला कि एकदम बेचैन वाटू लागल. प्रत्येक गोष्टीत चीड निर्माण होऊ लागली. मनू माझ्या पाठोपाठ आली असता तिला एकदम रागवायचो यावरून दिसून येत होत कि मी पूर्ण पने बदलून गेलोय.पण सांगणार कोण होत कि बहुना मला मला कोणी सांगितलं जरी असत तर मी ऐकणार नव्हतो.
एके दिवशी तिचे अकाऊंट बंद झाले आहे व यु कान्त सेंड मेसज म्हणून मला चित्रफित दिसू लागली, यात तर मग फारच वेदना मला होत होत्या मग तिला फोन कॉल केल असता परत स्वीच ऑफ येत होत, खूप बेचैन झालो,मी काय करतोय मला समजत नव्हत. घरी पण पूर्ण पणे चीड-चीड व भांडण होत होते.एकेदिवशी असच मनात वेगळे विचार व पुढे driving मधून माझा अपघात झाला व त्यात मला बेड रेस्ट सांगण्यात आल.मग मी पूर्ण वेळ घरीच असायचो, प्रेमा आणि छोटीशी मणू च्या परत एकदा सानिध्यात असल्याने समजून येत होत,आपण चूक कुठे केली....
माधुरी च्या priority लिस्ट मध्ये नसलेला मी ती रिप्लाय देत नाही म्हणून चिडत होतो, व कदाचित तिच्या सोबत स्वप्न रंगवले असते तर नक्कीच आणखी दुख पोटाला आले असते. मी पूर्ण पने स्वताला विसरून तिच्या साठी सर्व हाव - भाव बदलून एक वेगळ्या व साध्या शालीन शैलीत तिच्याशी हितगुज करत होतो आणि प्रेमा काही केल तरी तिच्यावर ओरडत,हे सर्व डोल्याभोवती फिरत होत.कधी शालीन भाषेत मी प्रेमा ला बोललो असतो तर आणखी ती खुशीने राहिली असती, तिला रागीट अथवा शालीन यावर प्रेम नाहीतर माझ्या पूर्ण अवगुण आणि दुर्गुण दोन्हींवर प्रेम आहे,कधी तिने फोन केल असता तू जेवण केली का हे नाहीच विचारलं , उलट तिलाच मी कामात आहे म्हणून तालात राहायचं,कदाचित तिला मी फोन केल असत व विचारलं असत तर ती आणखीन खुश झाली असती. सर्व जगाला ख़ुशी देण्याच्या नादात व माधुरी ला आपलस करण्याच्या नादात मी स्वतला विसरून प्रयत्न करत होतो. व जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते,मला खुश पाहण्यासाठी काहीही करू शकते तिच्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. सोन्यासारखी व एकदम लाडाची माझी मणू तिच्याकडेही मी दुर्लक्ष करत होतो. आज आजारात मी ज्यांना खुश करत राहिलो ते पाहत हि नव्हते व ज्यांना मी कधी चांगल पाहिलं नाही ते मला काळजी घेत होते. नशिबाचे आकडे सर्व उलटे फिरत होते, आकर्षण पोटी खूप चुका केल्या पण त्या यापुढे होणार नाहीत, मला समजून आल आपण कुठे चुकलो,.....
आकर्षण पोटी फक्त प्रेम आहे माझे प्रेम आहे,हे म्हणण्यात काही अर्थ नाही,
प्रेम हि भावनाच स्वतंत्र आहे,त्यामुळे प्रेम कोणावर बळजबरी लादता येत नाही,
प्रेम हे आज साठी अथवा उद्या साठी नसून जन्मो-जन्मा साठी हवेय,
देवा एक कर तेवढ....प्रेमा च मला जन्मो-जन्मी बायको म्हणून हवीय....
Keep it up Bhai 👍👌
ReplyDelete👍writing awsome👍
DeleteFinally happy ending :)
ReplyDeletehttps://npthaughts.blogspot.com/2021/05/blog-post_26.html please read next part
ReplyDelete