प्रतिक नुकताच ग्रदुएट झाला होता. मग स्वावलंबी होण्यासाठी तो आता नोकरीच्या शोधात होता. तो अगदी हुशार चलाख असल्याने त्याला नोकरी मिळालीही. मग घरी आई वडील त्याच्या लग्नाची आता घाई करत होते. प्रतिक च्या बहिणीचे अगोदरच लग्न झालेले असल्यामुळे प्रतिक चे लग्न उरकून मोकळा श्वास घ्यायला येईल या हेतूने ते नव नवीन स्थळ पाहत होते.याच दरम्यान स्नेहा च्या काकांनी तिचा बायोडाटा प्रतिक च्या आईवडिलांना दिला. त्यांना मुलगी पाहताच पसंत आली यामुळे त्यांनी प्रतिक सोबत आम्ही येत आहोत अशी कल्पना त्यांना दिली.
प्रतिक ने अद्याप बायोडाटा पाहिला नव्हता पण नाव स्नेहा यावरून तो ती कशी असेल याची कल्पना करत होता. ऑफिस मधून घरी आल्यानंतर घरी कोणीच त्याबद्दल बोलत नव्हत,पण मनात मात्र बायोडाटा पाहण्याची आस प्रतिक ला लागली होती. म्हणजेच काय तर तिचे नाव ऐकून तो तिच्या प्रेमात पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिस ला निघाला तेव्हा त्याला आईने गुरुवारी सुट्टी घे आपणास स्थळ पाहायला जायचं आहे अशी सूचना केली. तेव्हा त्याने आई ला बायोडाटा संबंधी विचारणा केली त्यावर आईने आता काय बघतो, त्यादिवशीच सर्व बघ व बोल म्हणत टाळाटाळ केली.
शेवटी गुरुवार चा दिवस उजाडला. प्रतिक त्याचे आई वडील व बहिण आजोबा असा परिवार घेऊन ते स्नेहा च्या घराकडे निघाले. प्रतिक एकदम मनातून खुश व थोडा भीतीने गोन्धळलेल्या अवस्थेत होता.तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर ते पोहोचले.
बैठक भरली सर्व जन स्नेहा ची वाट पाहू लागले यातच स्नेहा नाश्ता - चहा घेऊन आली व प्रतिक च्या अगदी समोर बसली. प्रतिक तिला पाहताच सर्व भान विसरून तो तिच्या प्रेमात पडला. याचेच कारण त्याने तिला एकही प्रश्न विचारण्यास सहमती दर्शवली नाही. शेवटी बैठक पार पडल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन द्वारे कळवू म्हणत सर्व जन घराबाहेर पडले.यातच स्नेहा ला परत एकदा पहाव या आशेने प्रतीक वळून वळून मागे पाहत होता. घरी आल्यानंतर सर्वाना नेहा पसंत होती यानिमित्ताने होकार त्यांनी दिली. पण पुढचा प्रश्न निर्माण झाला, आपण हुंडा किती बर घ्यायचं ?
हुंडा ??? हे समजताच प्रतिक ने त्याला विरोध केला पण आई व आजोबांनी तुला काही माहित नाही तू शांत बस म्हणत त्याला शांत बसवले. मोठ्या माणसांत उगाच कशाला बोलायचं म्हणत तो मग शांत पणे ऐकत होता. पण मनातून तो याबाबत निराश होता.
आई आजोबाना म्हणत होती, सुनिता च्या मुलीला नोकरदार मुलगा भेटला तर त्याला ११ लाख हुंडा दिले नंतर शशी च्या मुलाने पण १४ लाख हुंडा घेतल आहे. मग आपल पण मुलगा नोकरदार आहे मग आपण किमान १० लाख तरी घेतलाच पाहिजे....यावर आजोबा हि होकार देत होते. वडील मात्र प्रतिक प्रमाणे शांत ऐकत होते. पुन्हा प्रतिक चे वडील प्रतिक च्या रूम मध्ये आले, तुला स्नेहा खर पसंत आहे न ? हो बाबा, पण हुंडा घ्यायचं नको म्हणत होतो, प्रतिक उद्गारला. हो रे माझा पण हुंडा घेण्यास नकार च आहे रे, पण तुझी आई थोडीच ऐकणार आहे आता. व तिच्या सोबतीला आजोबा आहेत न. मग ते दोघांना समजावून सांगायचं म्हणजे दगडावर डोक आपटल्यासारख आहे. व त्यांचा हि काही दोष नाही रे, समाजात आजकाल हुंडा देन घेण म्हणजे फेशन झाली आहे. जास्त हुंडा घेतलं / किंवा दिल म्हणजे ते स्थळ चांगल व खूप पैसेवान आहोत आम्ही हेच दाखवून देण्याच काम होत आहे बघ... मग बाबा आपण तरी किमान यासाठी हुंडा घेऊ नये न.....,
To be continue....
No comments:
Post a Comment