मनीषा जय ला धीर देत बोलक, करू पाहत होती....
जय,जय अरे सांग न काय झाले, असं का रडतोयस ?
कशाबद्दल तुला एवढ दुख झाल आहे, सांग न, बोल.....
जय अश्रू पुसत अग आज हॉस्पिटल गेलो होतो न मग डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून तुला HIV म्हणजेच एड्स असल्याची पुष्टी केली आहे.
काय ?????? मनीषा ला हि धक्काच बसला...
मनीषा, अगदीच शांत झाली, तिला पुढे काय बोलावे हेच समजेना...
हे पाहून जय ने स्वताचे अश्रू पुसले व
जय मनीषा ची शांती तोडण्याचा प्रयत्न करु लागला, त्याला आता समजत होते कि स्वताला मजबूत व्हायला लागेल.
मनीषा, अग, मनीषा.... बोल न,
डॉक्टर काहीतरी यावर उपाय सांगतील न, बघ मी आहे तुझ्या सोबत, तुला काही होणार नाही, जय ने मनीषा च्या हातात हात देत घट्ट पकड केली व मिठी मारली.
मनीषा हि अश्रू अनावर होऊन रडू लागली. त्यांची मिठी घट्ट होत चालली होती. व यातूनच दोघांना हि आत्मविश्वास आणि आयुष्य जगण्यासाठी बळ मिळत होते.
दोघांचेही मन व अश्रू मोकळे झाल्यावर मनीषा ने जय ला विचारलं,
जय मला एड्स आहे म्हटल्यास तू सेंपल द्यायला हव रे,
हो ग,मी आजच देवून आलोय,
उद्या आपण जाऊन येऊ डॉक्टरांकडे, जय उत्तरला
मनीषा व जय दोघेही शिक्षित असल्याने एड्स बद्दल बऱ्यापैकी त्यांना मीहिती होती. त्यामुळे ते गोंधळून न जाता त्यावर परिपूर्ण उपचार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आज दिलेल्या गोळ्या घेतली न ? हो रे, म्हणत ती विचारात पडली,
जय तुला माहिती ना ? HIV हा सहज संक्रमण होत नाही, मग रे कस झाल असणार माझ्या शरीरामध्ये संक्रमण ?
हो, ग मी पण तोच विचार करतोय, पण जाऊदे आपण उद्या हॉस्पिटल जाऊन येऊ,
आता शांत झोप,पाहू काय होत पुढे....
हो रे, पण मन शांत होत नाहीय न, असं अचानक बर कस झाल असणार मला HIV संक्रमण....
जय च्या मनात असलेली सर्व प्रश्न मनीषा विचारत होती, पण उत्तर दोघांकडेही नव्हत, तरी या स्तिथीत दोघही एकमेकांना सांभाळत होते,
रात्री उशिरा पर्यंत जागे असल्याने व रडून डोळे थकल्याने ते दोघे सकाळी उशिरा पर्यंत झोपले.
जय च्या मोबाईल वर आई चा call आला त्यामुळे तो उठला,
हलो, अग आई मी झोपित आहे, करतो ना तुला पुन्हा, म्हणत त्याने आई चा फोन ठेवला व स्वतः उठून फ्रेश झाला. एवढ्यात मनीषा हि उठली होती.
दोघांनीही चहा - नाश्ता केला, मनीषा ने गोळ्या घेतल्या, तोवर घड्याळात ११:३० वाजत आले होते, मग दोघे हि हॉस्पिटल जाण्यासाठी निघाले,...
cont....
No comments:
Post a Comment