जय व मनीषा हॉस्पिटल मध्ये येऊन डॉक्टर ची भेट घेण्यासाठी बाहेर बसून होते. एवढ्यात डॉक्टर आले, जय ला पाहून स्मित हस्य देत डॉक्टर ऑफिस मध्ये प्रवेश केले. काही वेळात दोघानाही त्यांनी आत बोलावून घेतलं. याच सोबत त्यांनी जय ची रिपोर्ट जय समोर ठेवत जय ला बोलण्यास सुरुवात केली,
जय तुमची रिपोर्ट पण HIV positive आहे पण अद्याप घाबरण्याचे कारण नाहीय, कारण तुम्हाला एड्स झालेला नाहीय पण treatment तुम्हाला वेळोवेळी घ्यावी लागणार आहे.
व मनीषा,
माफ करा तुम्हाला एड्स हा तृतीय स्तरातील असल्याने treatment सोबत जास्तच काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे.
मनीषा व जय दोघेही शांत पणे डॉक्टरांचे बोलणे ऐकून घेत होते,
पण मनात मात्र भितिमय चित्र होते.
तृतीय स्तर ऐकताच दोघही अचानक अवाक झाले,
दोघेही काही बोलणार एवढ्यात डॉक्टरांनी सांगावयास सुरुवात केली,
मनीषा, I think तुम्ही गेल्या एक वर्षा पूर्वी किंवा त्या पूर्वी HIV संपर्कात आला होतात, त्यामुळे तुमच्या शरीरावर virus चा प्रभाव मागच्या सहा महिन्या पासून जास्त झालेला दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला आता मोठ आजार होण्यापासून सावध असायला हवे, अन्यथा त्यातून तुम्ही बरे होऊ शकणार नाही.
व जय तुमच्या बाबतीत हि तेच घडते आहे, फक्त तुम्ही early स्टेज मध्ये आहात एवढच. व अद्याप तुम्ही एड्स चे शिकार झालेले नाहीत. पण तुम्हालाही साधारण आजार होण्यापासून सावध राहायला हवे. यासाठी महत्वपूर्ण काळजी दोघांनीही घ्यावी.
यावर मनीषा आणि जय काहीच बोलू शकले नाहीत. दोघेही असं कस झाल ? याच विचारात पडले होते,
ऑफिस मध्ये सर्वत्र शांतता होती, ती भंग करत डॉक्टरांनीच पुढील प्रश्न केला,
तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला हा आजार होता का ? त्यावर दोघांनीही नाही अशीच प्रतिक्रिया दिली,
well in that case, माझ्यामते मनीषा तुम्ही सर्व प्रथम या विषाणूने ग्रस्त झाले आहात, व तुमच्या पासून पुढे जय..,
डॉक्टरांचे बोलणे संपणार आधीच मनीषा च्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले,
जय ला हि आता मनीषा ला कसे समजावयाचे हे कळत नव्हते, यावर डॉक्टरांनीच मनीषा ला समजावण्याचा प्रयत्न केला, मनीषा.... तुम्ही स्वताहून असं काही केल नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः ला दोष देऊ नकात, पहा जे उरलेले जीवन आहे ते तुम्ही दोघेही आनंदात घालवा, माझ्या मते तुम्हाला अपत्य नाहीय, याबद्दल मलाही दुख आहेच पण आता परिस्थिती शी सामना तुम्हाला, मला सर्वाना करावा लागतोच,
त्यामुळे तुम्ही please काळजी घ्या म्हणत डॉक्टरांनी मनीषा ची समजूत काढली.
जय देखील मनातून रडत होता पण मनीषा रडत आहे पाहून तो स्वताला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. अचानक सर्व जीवन उध्वस्त झालेलं होत, त्यामुळे त्याला हि डॉक्टरांना पुढे काय बोलावे समजत नव्हते.
डॉक्टरांनी पुढे जय तुम्ही तुमच्या कुटुंबियांना पण नक्की चाचणी करण्यास सांगा, तसेच मनीषा ला सांभाळा व काही मदत भासली तर नक्की call करा, यावर तुम्ही जाऊ शकता पण कोणताही आजार अंगावर काढू नका,....असे सांगत डॉक्टरांनी त्यांच्या परीने संभाषण संपवलं.
पण मनीषा हि मनातून हार मानाल्यासारखे रडत होती, जय तिला समजावण्यात असफल होत होता....,,
cont...
No comments:
Post a Comment