Thursday, February 24, 2022

मनीषा-मयंक भेट (भाग ९ )

          मनीषा सकाळी ९ - १० दरम्यान शहरात पोहोचली. मग तिला नेण्यासाठी मयंक अगोदरच येऊन थांबलेला होता. मग मनीषा बस मधून उतरली व सर्व प्रथम मयंक लाच तिची नजर शोधत होती. तितक्यात कोणीतरी बाजूने तिचा हात ओढत होता,ती त्याच्याकडे डोळे वटारून पाहणार कि तो मयंक होता. 

नालायका, मी मारणार होते न तुला, असं कोणी गर्दी च्या ठिकाणी हात ओढत का ?

मयंक, हसत होता...

काय दात काढतोय, चल लवकर कोणीतरी भेटलं म्हणजे संपल मग आपल म्हणत मनीषा मयंक च्या हाताला धरून ओढत बसस्टेन्ड च्या बाहेर नेली, अग थांब, असं काय करतेस....

मला गाडी तर घेऊ दे म्हणत मयंक ने तिला थांबवलं,

मयंक गाडी घेऊन आला, चल बस, अरे पण आपण जायचं कुठे ? मनीषा विचारली

मी आहे न सोबत,मग काळजी करू नको, म्हणत मयंक ने गाडी चालू केली व शहराच्या बाहेर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात त्याने मनीषा ला नेल...

वॉव, किती भारीय न निसर्ग, हो त्यामुळेच तुला आणलो न,

तुझी व निसर्गाची भेट घालून देण्यासाठी.... 

अच्च्छा...धन्यवाद,.... मनीषा उद्गारली.....

(मग दोघेही शेजारीच असलेल्या मोठ्या मोठ्या दगडांवर बसले)

असं किती रे दिवस चालायचं, आज न उद्या आपल्याला लग्न कराव लागणार आहे, मग आपले आई - वडील मागे लागण्या अगोदरच आपण लग्न करूयात न.... मला पण तुला सोडून खरच नाही रे राहू वाटत,

मी घरात सतत एकटी असते, मग मला खूप त्रास होतो त्याचा, पप्पांमुळे कुठे जाता येत नाही व कोणी नातेवाईक हि जवळ नाहीत त्यामुळे मी एकटीच असते.... मला तो एकांत तोडायचा आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यामुळे तू विचार कर न आपल्या लग्न चा लवकर,....

मनीषा मनातील सर्व भावना व्यक्त करत होती, पण मयंक च्या डोक्यात काही वेगळच चालू होत.

मनीषा च सर्व बोलन संपल तेव्हा, मयंक जागेवरून उठला, मनीषा तू म्हणत आहेस ते अगदी बरोबर आहे ग व मला पण खर तुझ्या शिवाय करामत नाही बघ, पूर्वी कस आपण एकत्र राहायचो, कॉलेज मध्ये बागडण वगैरे ते तुझ्या विना काही करमतच नाहीय बघ, सर्व भकास वाटत आहे,

अग सध्या एक काम होऊ शकत, (मयंक मनीषा बसलेल्या दगडावर तिच्या बाजूला येऊन बसला )

तू राहण्यासाठी परत ये ना, आज जस आलीस तसं बघ ना, आई - वडिलांना बोलण्याचा प्रयत्न कर ना.., मग आपले सर्व प्रश्न सुटतील ग, please एकदा तू बोल न घरी....

तू इथ आलीस म्हणजे तुझाही एकांत नाहीसा होईल व माझ पण मन लागेल, बोल न....(मनीषा ला मनवण्याच्या बहाण्याने मयंक तिच्या शरीराला वारंवार हात लावत होता )

मनीषा एकदम चिडून, अरे हो रे मी बोलून पाहते पण पप्पा ऐकणार नाहीत, आजच कस काय ऐकल कि त्यांनी, अन्यथा मला घरा बाहेर पाऊल टाकण्यास परवानगी नाही.....म्हणत मनीषा ने मयंक चा जवळ आलेला हात दूर केला.

बर मग आज आपण भेटलेल काही गिफ्ट देणार कि नाही मला..

आता काय हवंय माझ्या नवरोबाला, आज मी इथे आले तेच एक गिफ्ट आहे ना, मग व्हा खुश....

नवरोबा....मयंक खुशीने व लाडात मनीषा कडे पाहत बोलला, 

हा, तुम्ही आता आमचे नवरदेव होणार म्हटल्यास, नवरोबा 

मग या नवरोबा ला एक किस मिळेल का ? आज च गिफ्ट....

हो, मिळेल की, तुम्ही अगोदर आमच्याशी लग्न करा, मग सर्वस्व तुमचच आहे नवरोबा,

अग तेव्हा च तेव्हा पाहू न मला आज गिफ्ट हवंय, please मी डोळे बंद करतो, तू दे न ग,

म्हणत मयंक ने डोळे बंद केले.....

मनीषा च्या समोर वेगळाच प्रसंग निर्माण झालेला होता, तिला काय करावे ते समजत नव्हते पण मयंक वारंवार म्हणत असल्यने तीही फक्त एक किस या अटीवर मान्य झाली...

पण परत थोड्या वेळाने आता माझी बारी, मला रिटर्न गिफ्ट तर देऊ दे ना,.....

म्हणत मयंक ने तिच्या चेहऱ्या ला घट्ट पकडत तिच्या ओठांचा चावा घेतला,

मनीषा अगदीच स्वताला सोडवण्याचा प्रयत्न करत, पण ओठ ने बोलता येत नसल्याने सोड मला सोड मयंक म्हणून बोबड बोलत होती, इतक्यात मयंक चे हात मनीषा च्या वक्षाना दाब निर्माण करत होते, याला विरोध करत मनीषा अचानक पणे आक्रमक होऊन मयंक पासून स्वताला दूर करत जागेवरून उठली,....

मनीषा, अग काय झाल,

माझा राग आला का ? sorry यार पण यात चुकीच काय, तू माझीच होणार आहेस मग मी माझ्या पत्नीला असं बिलगु नये का ?   मयंक मनीषा ला समजावण्याचा प्रयत्न करत होता,

अरे हो, मी तुझीच आहे पण मला हे आता करणे योग्य वाटत नाही, please तू मला समज ना, आजही व आपल लग्न झाल्या नंतरही मी तुझीच आहे रे.....

व आज भेटल्या बद्दलच गिफ्ट आपण देवाण - घेवाण केलो ना, मग चल ना आता जाऊया आपण,

मला वापस गावी जायचं रे, मयंक 

नाहीतर तू पुन्हा बोलावल्यास मी येऊ शकणार नाही बघ,

ok, चल आता वेळ हि झालाच आहे मग जेवण करू आपण व तुला मी बसवतो बस मध्ये, म्हणत मयंक उठला व गाडी काढली,

मनीषा स्वताचा ड्रेस सावरून घेत बसली व परत दोघेही शहराकडे निघाले....

cont.... 

No comments:

Post a Comment

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...