Wednesday, February 23, 2022

भेटीचा योग (भाग ८)

         मनीषा अश्रू द्वारे विरह व्यक्त करत असूनही तिचे विचार काही थांबत नव्हते, उद्या मम्मी - पप्पा येतील मग त्यांना एड्स कस झाल ? याबाबत काय सांगू, त्यांना माहित आहे...मयंक...? मनीषा पूर्णतः गार झाली...मग उद्या जय ला पण आपल्या past बद्दल समजेल, मग तो हि मदत नाही करणार.....? तिच्या विचारांची साखळी वाढत होती.

मयंक बद्दल जय ने विचारल्यास आपण काय सांगावे ? हा विचार तिला चमकला व ती परत एकदा मयंक ला आठवू लागली, एके दिवशी रात्री आई - वडील झोपल्यानंतर मनीषा ने वडिलांचा चार्जिंग ला लावलेला mobile हळूच काढून घेतला व त्यास silent करत तिने आपल्या रूम मध्ये जाऊन मयंक ला call केला. खूप दिवस झाले भेट झाली नाही, मग एकदा किमान व्हिडीओ call तरी कर या मयंक च्या हट्ट वर तिने मयंक ला व्हिडीओ call केला. खूप दिवसांनी मयंक व मनीषा ने एकमेकांचा चेहरा पहिला नव्हता, व रात्री मनीषा ने नाईट ड्रेस घातलेला असल्याने तिला पाहून मयंक चे पूर्णता डोळे फिरले. 

मनीषा, मला तुझी फोटो पाठव न, अग किती दिवसांनी मी तुला पाहतोय.केव्हा तुझी आठवण आली तर मी त्या फोटो कडे पाहत राहीन,

तेवढ्यात मनीषा ला कोणीतरी आल्याचा आभास झाला त्यामुळे तीने पटकन call बंद केला. 

पण मयंक अतृप्त होऊन तिला call करत होता, तेव्हा तिने त्यास whatsapp वर बोलू म्हणत फोन ठेवला. 

मयंक ने काही सेकंदातच तिच्या वडिलांच्या whatsapp वर मेसेज केला व परत तिच्या फोटो ची मागणी केली. 

मनीषा ने हि अगदी त्याची मागणी मान्य करत त्यास स्वताच्या ३-४ सेल्फी काढून पाठवली.

त्यावर मयंक ने मनीषा ला परत मेसेज करून - 

मनीषा अग आपण प्रेम करतो न एक दुसऱ्यावर व आपण लग्न हि एकमेकांशीच करणार आहोत मग तू माझ्यासाठी काय करशील बर ?

त्यावर प्रेमात पूर्णतः आंधळी झालेली मनीषा -

हो , मी तुझ्यावरच प्रेम करते रे.. मयंक व तू बोलून बघ मी नक्की करते,

मनीषा, अग तू पहिलीच आहेस जिच्या मी इतका जवळ आलोय, त्यामुळे न मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे,

मग आपण भेटूयात का ?

पण कधी व कुठे ? मम्मी - पप्पा ला पता लागल कि मारून टाकतील रे मला,

तू आत्ताच म्हणाली होतीस न पण कि काहीही करेन मग तुला यायला लागेल. 

बर ठीक आहे, मी येईन पण कुठे भेटायचं रे ?

कॉफी शॉप किंवा लॉज, चालेल न ?

हो चालेल मी उद्या सांगते तुला,

मग आता गुड नाईट वाली सेल्फी तर पाठव न, 

हो रे म्हणत मनीषा ने परत 2-३ सेल्फी काढून त्याला पाठवल्या व whatsapp chat delete करून mobile चार्जिंग ला लावली.

दुसऱ्या दिवशी मनीषा ने तिच्या मैत्रीण च्या नावाने स्वतः मेसेज करून मम्मी - पप्पांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जाऊ देत म्हणून आग्रह केला. आई - वडील असल्याने पोरीच शिक्षण वाया कशाला घालवायच म्हणत त्यांनीही तिची विनंती मान्य केली.

परत रात्री तिने मयंक ला मी येतेय उद्या म्हणून सांगत 2-४ सेल्फी पाठवल्या व मयंक च्या हि भावना जागृत झाल्या. 

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज जात असल्याने मनीषा ने स्वताचा mobile वडिलांकडून घेतला व ती शहराकडे निघाली. 

cont..... 

No comments:

Post a Comment

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...