Thursday, May 27, 2021

प्रेमा मला मिळाली

 आकर्षण व प्रेम_अंतिम भाग 

PC मधून व मनातून माझ्या जीवनातील एक अनावश्यक पण त्रासदायक पार्ट मी delet करून प्रेमा कडे परतलो.परतत असताना मनावरील ओझ कमी झाल्या सारख वाटत होत.म्हणजे मी खुश होतो नव्याने जीवन सुरुवात करण्यासाठी.त्यातच मी room मध्ये आलो,पण प्रेमा आणखी कसल्यातरी द्विधेत असल्याच मला जाणवलं.तिच्या जवळ जाऊन,अग मी ते सर्व delet केलो आहे.त्यामुळे तू आता त्याबाबत चिंता नकोस करू.व मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. बाकी कोणीही माझ्या जीवनात नाहीय....विश्वास ठेव,.हे ऐकताच तिचे डोळे पाणावले. तिला समजवत धीर देण्याचा प्रयत्न मी करत होतो.तेव्हा तुम्हाला मला पण काहीतरी सांगायचं आहे....म्हणत ती भावूक झाली होती. अग बोल न,रडतेस कशाला मग,नाही पण तुम्ही ते ऐकल्या नंतर मला माफ करा व रागावू नका...हो ग,मी नाही रागावणार...उलट तूच मला रागवू शकते झालेल्या कृत्यावर...बर सांग मी ऐकत आहे...,

आपल लग्न होण्याच्या आधी म्हणजे कॉलेज च्या शेवटच्या वर्षात,असं काही झाल होत ज्यामुळे बाबांनी माझ पुढील शिक्षण बंद करून लग्न लावून देण्याच ठरवलं.मी कुतुहूलपूर्वक पाहत होतो,मला थोडस ती काय म्हणत आहे यावर विश्वास बसत नव्हता.पण तिला धीर देत मी शांत पने ऐकत होतो. 

         एके दिवशी रात्री आम्ही सर्व जन जेवण करुन बोलत बसलो असता माझ्या मोबाईल वर call आला. तिथे सर्व जण बसले होते त्यामुळे मी थोड दूर वर येऊन ,हलो कोण बोलत आहात? एका १९-२० वर्षाच्या मुलाचा मला आवाज कानी आला.हलो,तुम्ही प्रेमा बोलताय ना..हो पण आपण कोण?हा मी बोय्स होस्टेल मधून बोलतोय,तुमचा नंबर होस्टेल मधील बाथरूम मध्ये लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे मी  त्यासाठी फोन केलेला आहे कि हा नबर ज्या अर्थाने लिहिला गेलेला आहे,त्यासाठीच आहे अथवा नाही? हे ऐकताच मला (प्रेमा) पुढे काय बोलावे समजत नव्हते.पायाखालची जमीन नाहीशी झाली. पुढून आवाज येत होता,हलो,हलो ... मी सावध होत sorry,wrong no. म्हणून फोन पटकन ठेवून टाकला व रूम मध्ये जाऊन काय घडत आहे - हे खरे असेल का म्हणत विचार करू लागले.तेवढ्यात परत call आला,आता मात्र उचलण्याची भीती वाटत होती.त्यामुळे मी स्वीच ऑफ करून टाकला व बेड वर पडले.सकाळी आई ला हे सर्व सांगितलं व आई ने बाबांना. बाबांनी थोड रागवल,त्यामुळे म्हणत होतो मोबाईल नको म्हणून आता केल न,तोंड काळ.पण आई ने त्यांना समजावत अहो ती अगोदरच घाबरून गेलीय तुम्ही आणखी नका न ओरडू तिला.मी घरीच राहिले. बाबांनी मोबाईल चालू केला,चालू केल्या बरोबर,मेसेज वर मेसज आलेले.हे पाहून बाबा पण दंग झाले.मी तर शांत अगदी चित्त झाले. पुढे करायचं काय ? हा प्रश्न होता. मग बाबांनी पोलिसात कम्प्लैन करणे हेच योग्य होईल,म्हणून आम्ही पोलीस मध्ये गेलो. तिथे सर्व details दिल्या.समजल ते आमच्या कॉलेज च बॉय्स होस्टेल आहे.मग आम्ही ताबडतोब पोलिसांबरोबर होस्टेल गाठलो व तेथील वार्डन शी त्यावर चर्चा केली. व ज्या नंबर वरून call आलेला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.पण पुढील कार्यवाही मध्ये नाव जाईल म्हणून बाबांनी केस न करताच त्यांना धमक दिली.व पोलिसांनी हि वार्डन ला no. लिहील गेल्या संदर्भात सूचना केल्या व लवकरात लवकर त्यास नाहीस करा,अन्यथा परत आम्हाला याव लागेल.पण या सर्व मध्ये हा प्रश्न कायम होता तो म्हणजे असे कोणी केले? यावर पोलीस व बाबांनी होस्टेल मध्ये तुझा number असणारा कोण राहतो ?अशी विचारणा केली. त्यावर माझ्या वर्गातील होस्टेल मध्ये फक्त शेखर असतो. शेखर...नाव ऐकताच थोड मनामध्ये तिरस्कार व भीती निर्माण झाली.

          शेखर हाच होता ज्याने मला अगदी आठवड्या पूर्वी प्रेमाची मागणी घालत होता.त्याचे प्रेम हे एकतर्फी होते. त्यामुळे मी त्यास स्पष्ट नकार देत त्याच्या प्रेमाची अपेक्षा भंग केली होती. warden नी इतक्यात शेखर ला बोलावून घेतले. पोलिसांनी धमक दिल्यानंतर त्याने याबाबत कबुली दिली व हे कृत्य त्याचेच असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आम्ही घरी निघून आलो. घरी आल्या नंतर बाबांनी माझ कॉलेज जान च बंद केल. व याच वर्षी तुझे लग्न लावून देईन म्हणत त्यांनी शोधाशोध चालू केली.लग्न मोडू नये व माझ्या चरित्र वर संशय येवू नये म्हणून मी व बाबांनी तुमच्या पासून हे सर्व लपवून ठेवलं.पण आज जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भूतकाळ सांगितलं तेव्हा मला राहवल नाही म्हणून मी बोलले...म्हणत ती आणखी रडू लागली.

       हे सर्व मी अगदी शांत पणे ऐकून घेत होतो.आता मला समजत नव्हते कि यावर तिला कशा पद्धतीने सांभाळू,अग तू काळजी नको करू मी सोबत आहे. आता ते झालेलं सर्व विसर.तो तुझा भूतकाळ होता.व त्यावर मी आज निर्णय घेणार नाही. व तुझ चरित्र कसं यावर मी काहीच टिप्पणी करू शकत नाही.यामुळे तू व मी आपण दोघही आपला भूतकाळ आज पासून विसर्लेलाच बरा. म्हणत तिचे अश्रू पुसलो व तिला प्रेमाने बेड वरून उठवत डोळे झापण्यास सांगीतलो.व मी तिच्या पुढे आणलेली गिफ्ट सरकवत डोळे उघडण्यास सांगीतलो. ती रडत-हसत मला एकदम मिठी मारली.ThankYou ती मला व मी तिला I Love You म्हणत होतो. आज आमच्या मैत्रीची सुरुवात होत होती. आम्ही दोघांनी ठरवल यापुढे आपण पती - पत्नी न राहता मित्र आहोत.दोघांमध्ये कोणत्याही शंकेला अथवा अन्य व्यक्तीला कुठेही जागा नाही.आपल दोघांच हि हृदय हे फक्त आपल्या प्रेमानेच भरलेल असेल....

आज मन हलक करून व तिचा विश्वास जिंकून जगातील सर्वात खुश व्यक्ती मी झालेलो होतो.मला माझ विश्व मिळालेलं होत. जिच्या साठी मी मृगजळ सारख वावरत होतो ती माझी प्रेमा माझ खर प्रेम बनून माझ्याच सानिध्यात होती.... 

Wednesday, May 26, 2021

द्विधा

 बायको_चा पुढील भाग 

मणू आणि प्रेमा च्या सानिध्यात राहून व त्यांचे माझ्यावरील प्रेम याने मी लवकर ठीक होऊन पूर्ववत ऑफिस जाण्यास एकदम तयार झालो. आज खूप दिवसांनी ऑफिस चा पहिला दिवस होता. गाडी मधून उतरून ऑफिस च्या दिशेने जस - जस जात होतो तसे सर्व कर्मचारी आदराने विश करत होते. सर्वांचे सुमने स्वीकारत मी डेस्क कडे वळलो. आज सर्व काम अतिशय उत्सुर्फपणे पार पाडत होतो.राहिलेल्या पेंडिंग फाइल्स सर्व निपटून मी घराकडे जाण्यास निघालो. खूप दिवसांनी आज बाहेर आल्याने प्रेमा साठी काहीतरी न्यावे, या विचाराने मी काय न्यावे  विचार करत होतो.स्त्रियांना काय आवडेल याची कल्पना नव्हती पण खूप दिवस झाले खरेदी नाही केली म्हणत साडी घेण्याच ठरविलो.ऑफिस च्या जवळच शॉप होत.त्यामुळे चालतच गेलो व तेथील कर्मचारी ना सांगितलं.त्या विचारत होत्या रंग कसा व प्रकार वगैरे...?मला त्याबद्दल जास्त काही माहिती नसल्याने पण अगदीच सामान्य प्रमाणे मोवी मध्ये पाहिलेलं आठवून लाल रंग सांगितला.त्यांनी अगदी माझ्या समोर ढीग लावला व वर्णन करत होते,ते लक्ष न देता मी एक साडी पसंत केली व अगदीच गिफ्ट करून घेतली.व ऑफिस च्या दिशेने येऊन गाडी द्वारे घराकडे निघालो. 

         घरी आल्यानंतर प्रेमा ला सरप्राइस देण्याच्या हेतूने, तोपर्यंत गिफ्ट bag study Room मध्ये ठेवण्यासाठी मी study room कडे वळलो.आत प्रवेश करताच मी सरप्राइस झालो.PC वर प्रेमा आणि मणू काहीतर करत होते. मग येथे जमणार नाही म्हणत मी उलट्या पावलांनी मागे आलो व बेडरूम मध्ये जाऊन लपवलो.नंतर फ्रेश होऊन मनु सोबत खेळण्यासाठी study room मध्ये गेलो. प्रेमा ने मला पाहताच आलात तुम्ही म्हणत PC बंद केला व बाहेर निघून गेली. रात्री ९ दरम्यान जेवण झाल,प्रेमा मणू ला झोपवून room मध्ये आली. त्यानंतर मी प्रेमा कडे हळूच गिफ्ट समोर करणार इतक्यात तिने म्हटलं,मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे,खर खर व नक्की सांगा हा!! व रागावू नका please,मी सहज विचारत आहे.ही शब्दांची जाळी मला समजून येत नव्हती. पण मनात प्रेम भावना असल्याने मी, नक्की बोल न काय झाले...., काय विचारायचं आहे.....त्यावर तिने थोड घाबरत व अगदी हळू दबक्या आवाजात,अहो आज मनु व मी PC वर बसलो होतो न तेव्हा.....,हे ऐकून थोड माझ्या चेहऱ्याचा रंग उडत चालला होता.माझ्या हाता मध्ये असणार गिफ्ट मी हळूच मागे सरकवत,हा बोल न मग काय झाले.....,अहो तुमच्या कॉलेज दरम्यान चे वगैरे फोटो पाहीले. मी एवढंच न.... मग त्यात काय झाल ग..., अहो नाही त्यात आणखी हि काही होत ज्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं होत....त्या फोतोंसोबत काही स्क्रीन_शॉट पण होत्या. आता मात्र मी निशब्द झालो, मला समजून आल कि हिने माधुरी सोबत बोललेलं पाहिलं आहे.माझी समाधी तोडत तिने पुढे बोलण्यास सुरुवात केली.त्यात तुम्ही माधुरी ला बोललेलं आहे,अहो खर सांगा न, माधुरी वर तुम्ही प्रेम करता का ?

        सर्व शब्द मला निशब्द करत होते. आकर्षण च्या भावनेतून मी सर्व स्क्रीनशॉट जमा केल्या होत्या.व PC मध्ये थोड जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी ती हार्ड डिस्क लावलो खर पण ती काढू शकलो नाही. प्रेमा ला विश्वासात घेत, अग ते खर आहे कि मी माधुरी ला बोललो व कॉलेज मध्ये असताना ची ती माझी मैत्रीण पण तीच लग्न झालेलं आहे व ते सहज खूप दिवसांनी म्हणून फोर्मल बोललो....पण मग तुम्ही 💓माधुरी💓 या नावाने फोटोस सेव केलेल्या आहेत ते, अग अगदी खर सांगितलं तर मी तिच्याप्रती आकर्षित होतो हे सत्य पण आता नाहीय,मला समजून आलेलं आहे कि मी चूक करतोय. 

         तू व मनु असताना मी बाहेर प्रेम शोधन हे अन्याय आहे.तुम्ही माझ्या प्रत्येक सुख दुख मध्ये कसोशीने सोबत आहात व मी जे शक्य नाही त्या गोष्टीच्या मागे लागलेलो होतो. खर पाहिलं तर तुझ्या मुळे आज मी एवढा सुखी आहे,कारण तू माझ्यावर प्रेम करतेस.अगदीच मी कसाही वागलो तर माझ्यावर प्रेम करत मला सांभाळून घेतेस. तुला अगदीच हक्क आहे ग माझ्यावर रागवायचा पण माधुरी फक्त आकर्षण होत,जे मला समजण्यास थोडा उशीर झाला..पण समजून नक्की आल.,

मग ऑफिस मध्ये तर तुम्ही बॉस आहात तेव्हा ऑफिस....त्यावर तिचे शब्द थांबवत म्हणलो,तसं काहीच नाही व यापुढे नक्कीच होणार नाही...तो असलेला data मी आताच delet करून येतो म्हणत मी ताडकन उठलो व study room कढे निघालो.प्रेमा मात्र एक वेगळ्याच द्विधे मध्ये होती...ती तिथेच बसून विचार करत होती,तिला खुश व्हायचे कि नाराजी व्यक्त करावी समजत नव्हते. मी सर्व फाइल्स एकदाच select करून delet button दाबल,त्या फाइल्स delet होण्यास थोडा वेळ लागणार होता तेव्हा मनात सुचल,

ऑफिस मधले नसून 

फेसबुक वरचे माझे प्रेम....

तिचे स्टोरी पाहण्याचा आणि सेव करणे 

हा माझा नित्य नेम ,

असं माझ फेसबुक वरील एकतर्फी प्रेम....  

Monday, May 24, 2021

बायको

 मैत्रीण_ चा पुढील भाग,

माधुरी च नाव घेताच पूर्ण इतिहास मला आठवत होता, कळत नकळत मी तिच्यावर प्रेम करत होतो, मला तिच्याशी एकदा तरी बोलायचं होत,....हे असे सर्व विचार डोक्यात चकरा घालत होते त्यामुळे झोप काही येतच नव्हती. मग मी थोड्या पूर्वीच्या फोटो पहाव म्हणून PC वर बसलो.प्रेमा ला याबद्दल काही माहिती नसाव किंवा तिला मी सांगितलं नव्हत त्यामुळे कोलेज जीवनातील वेगळी हार्ड डिस्क टाकून थोडे आठवणी ताज्या करत होतो,यातच दिवस उजाडत आला. ऑफिस मध्ये कॉल करून आजच शेडूल मागवलं,त्यानुसार थोडा वेळ मिळाला थोड झोपलो व रेडी होऊन ऑफिस ला निघालो. जाता जाता मनातून काही माधुरी बद्दलचे विचार मला सोडण्यास तयार नव्हते त्यामुळे मी फेसबुक मध्ये जाऊन तिला रिक्वेस्ट पाठवली व म्हटलं जर तिला ओळख असेल तर पाहू नाहीतर त्या विषयाला राम राम करू.

          ऑफिस मध्ये आज काही जास्त काम नव्हत फक्त ऑडीट होऊन आलेल्या फाइल्स चेक करायच्या होत्या.मग त्या करत बसलो असता मोबाइल वायब्रेत झाला.प्रेमा चा कॉल होता.आता ऑफिस मध्ये जमणार नाही व कामात आहे यार्थाने त्यास मी पॉवर बटन दाबून परत चेक करत बसलो. काम झाल्यानंतर लंच टाइम मध्ये प्रेमाला बोललो,मणू तिथे एकदम शांत झालेली व मला पप्पा कडे वापस जायचं म्हणून हट्ट करत होती. मग प्रेमा ने जेवण वगैरे कस केलात म्हटली मी कॅन्टीन आहे तू नको काळजी करू मी काळजी घेतोय, तू तुझी व मणू ची काळजी घेत फोन ठेवलो. इवेनिंग मध्ये ऑफिस बंद झाल्यानंतर मी घरी निघालो. मनात अगदी माधुरी चा विचार होताच, ती काय म्हणेल,असेप्त करेल कि नाही? पुढे काय बोलू....मन या विचारांनी अगदीच भरून येत होत,पण आणखीन तरी तिने असेप्त केलेली नव्हती.घरी येऊन खिचडी घालून जेवणास बसतोच कि नोटीफिकेशन आली रिक्वेस्ट असेप्तेड.मी अगदीच ख़ुशी ने पागल झालो. ती हि ओनलाईन होती व आता मी पण,पण आमच्या पैकी चर्चा कोणी सुरुवात करत नव्हत. मग मीच पुढाकार घेत 

me- hii

madhuri- hii 

me- are kuthe aahes,khup divas jhale na bhetun, tujha tar ha call pn lagat navhata.

mdh- ho,are ha mobile mi ithech maheri thevun gelela hota,sasari mi tyanchach mobile use karate na,

me- are vva tu ghari aaleli ka

mdh- ho 

me- kiti divas rahanar

mdh-are tyana kama nimitt MP la jav lagal aahe mg toparyant mi ithech aahe, te return aale ki janar aahe vapas

mdh- pn sadhya tu kuth aahes?

me-are mi CA jhalo na, mg sadhya transfer karun ghetloy HYD

mdh- khup lamb re gelas mg,

me- ho 

mdh- mg kadhi yenar ikde v lagn jhal ki nahi...

me- yeil lavakarach 

me- are mi aloch ha thod kam aahe...

लग्न झाल का ? विचाराल्य्ने मी गोंधळून गेलो तिला काय सांगायचं म्हणून शांत झालो. इतक्यात प्रेमा चा कॉल आला, तिला जेवत आहे म्हणत सर्व चर्चा उडवून लावत करतो आता उद्या सकाळी,खूप थकलोय म्हणत ठेवून टाकलो.

परत फेसबुक वर जाऊन तिला मेसेज चालू केला..आमचं चर्चा चांगलीच रंगली होती, कधी १२ वाजले व ती प्रत्येक वेळी चर्चा थांबवण्यासठी प्रयत्न करत होती आणि मी रिप्लाय देतच होतो शेवटी तिने Gn म्हणून ऑफलाईनगेली व मी पांघरुणात आज हि तिच्या मनात खरच मी असेल का ?

तिला एकदाच विचारव का ? अशा विचारांनी सुख भोगत होतो.सकाळी अगदीच अलार्म न लावता लवकर उठून अगोदर तिला मेसेज केला.हे असच चालू झाल. यामुळे कामा मध्ये लक्ष लागनास झाल. व भावना आता जास्त बळकट होत होत्या तिला एकदा विचाराव ती नक्कीच हो म्हणेल, जरी लग्न झालेलं असल तरी पाहता येईल. या विचारांनी मी हि अनिल कपूर,सलमान खान व गोविंदा अगदीच बनत चाललो होतो. मधेच या विचारांना व माझ्या भावनांना ब्रेक लावत प्रेमा आज वापस आली. यामुळे रोज रात्री माधुरी ला बोलत बसण्याच्या कार्यक्रमाला ब्रेक लागणार होता. मग प्रेमा ला काम करतोय म्हणत स्टडी रूम मध्ये जाऊन PC वरून बोलू लागलो. ती अगदीच जवळ येत गेली व माझ्या भावना आता एकदम तीक्ष्ण स्वरूप धारण करत होत्या. तिचा रिप्लाय आला नसला कि एकदम बेचैन वाटू लागल. प्रत्येक गोष्टीत चीड निर्माण होऊ लागली. मनू माझ्या पाठोपाठ आली असता तिला एकदम रागवायचो यावरून दिसून येत होत कि मी पूर्ण पने  बदलून गेलोय.पण सांगणार कोण होत कि बहुना मला मला कोणी सांगितलं जरी असत तर मी ऐकणार नव्हतो.

            एके दिवशी तिचे अकाऊंट बंद झाले आहे व यु कान्त सेंड मेसज म्हणून मला चित्रफित दिसू लागली, यात तर मग फारच वेदना मला होत होत्या मग तिला फोन कॉल केल असता परत स्वीच ऑफ येत होत, खूप बेचैन झालो,मी काय करतोय मला समजत नव्हत. घरी पण पूर्ण पणे चीड-चीड व भांडण होत होते.एकेदिवशी असच मनात वेगळे विचार व पुढे driving मधून माझा अपघात झाला व त्यात मला बेड रेस्ट सांगण्यात आल.मग मी पूर्ण वेळ घरीच असायचो, प्रेमा आणि छोटीशी मणू च्या परत एकदा सानिध्यात असल्याने समजून येत होत,आपण चूक कुठे केली.... 

माधुरी च्या priority लिस्ट मध्ये नसलेला मी ती रिप्लाय देत नाही म्हणून चिडत होतो, व कदाचित तिच्या सोबत स्वप्न रंगवले असते तर नक्कीच आणखी दुख पोटाला आले असते. मी पूर्ण पने स्वताला विसरून तिच्या साठी सर्व हाव - भाव बदलून एक वेगळ्या व साध्या शालीन शैलीत तिच्याशी हितगुज करत होतो आणि प्रेमा काही केल तरी तिच्यावर ओरडत,हे सर्व डोल्याभोवती फिरत होत.कधी शालीन भाषेत मी प्रेमा ला बोललो असतो तर आणखी ती खुशीने राहिली असती, तिला रागीट अथवा शालीन यावर प्रेम नाहीतर माझ्या पूर्ण अवगुण आणि दुर्गुण दोन्हींवर प्रेम आहे,कधी तिने फोन केल असता तू जेवण केली का हे नाहीच विचारलं , उलट तिलाच मी कामात आहे म्हणून तालात राहायचं,कदाचित तिला मी फोन केल असत व विचारलं असत तर ती आणखीन खुश झाली असती. सर्व जगाला ख़ुशी देण्याच्या नादात व माधुरी ला आपलस करण्याच्या नादात मी स्वतला विसरून प्रयत्न करत होतो. व जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते,मला खुश पाहण्यासाठी काहीही करू शकते तिच्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. सोन्यासारखी व एकदम लाडाची माझी मणू तिच्याकडेही मी दुर्लक्ष करत होतो. आज आजारात मी ज्यांना खुश करत राहिलो ते पाहत हि नव्हते व ज्यांना मी कधी चांगल पाहिलं नाही ते मला काळजी घेत होते. नशिबाचे आकडे सर्व उलटे फिरत होते, आकर्षण पोटी खूप चुका केल्या पण त्या यापुढे होणार नाहीत, मला समजून आल आपण कुठे चुकलो,.....

आकर्षण पोटी फक्त प्रेम आहे माझे प्रेम आहे,हे म्हणण्यात काही अर्थ नाही,

प्रेम हि भावनाच स्वतंत्र आहे,त्यामुळे प्रेम कोणावर बळजबरी लादता येत नाही, 

प्रेम हे आज साठी अथवा उद्या साठी नसून जन्मो-जन्मा साठी हवेय,

देवा एक कर तेवढ....प्रेमा च मला जन्मो-जन्मी बायको म्हणून हवीय....





मैत्रीण..

 मनु च्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या नंतर प्रेमा माहेरी व मनु मामा कडे जाण्याचा अट्टहास करत होते त्यामुळे त्यांना रेल्वे ने पाठवण्यासाठी रेल्वे स्टेशन वर गेलो.ट्रेन थोडी लेट आली व १० वाजले मग त्यांना योग्य त्या बोगी मध्ये व आरक्षित सीट वरती बसून मनु चा पापा घेत त्यांना पाठवणी करून घराकडे येण्यास वळलो, रेल्वे स्टेशन च्या बाहेर पडताच मोबाईल वर फेसबुक ची नोटीफिकेशन आली.मोबाईल हातात होता व मी घाईत त्यामुळे त्याकडे लक्ष न देता स्किप करून पार्किंग मध्ये जाऊन गाडी काढलो.सकाळी ऑफिस ला लवकर जायचं या साठी आज अलार्म लावून झोपावं लागेल कारण प्रेमा घरी नाही न.. हे असे उद्याच्या दिवसाची रण नीती मी करत होतो.शेवटी घर आल. गाडी मध्ये घेऊन गेट वगैरे लावलो.नंतर झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेलो. व अलार्म लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला. होम पेज ओपेन केले असता फेसबुक ची नोतीफिकेषण आलेली दिसली.ती काय आहे हे पाहण्यासाठी फेसबुक ओपन केलो.नोतीफिकेषण म्हणजे मला एक फ्रेंड सजेशन आलेली कि तुमच्या contact लिस्ट मध्ये असणारी माधुरी हि फेसबुक वरती नुकतीच आलेली आहे व तुम्ही तिच्याशी मैत्री करू इच्छिता का ? माधुरी हे नाव ऐकताच थोडा मनामध्ये थरकाप सारखा झाला. वाटल हे कस काय झाल.पुन्हा contact लिस्ट चेक केली तर खरच त्यात 💓 माधुरी 💓नाव दिसलं.डोळ्यातील व डोक्यातील झोप पूर्णतःनाहीशी झाली.इतक्यात मोबाईल वर रिंग आली मी वर्तमानात आलो,प्रेमा चा कॉल होता...मी उचलून बोलू लागलो,ती विचारत होती घरी पोहोचलात का?जर भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये डब्बा ठेवला आहे तुम्ही खाऊन घ्या. मी तीच बोलन थांबवत मनु कुठे आहे म्हटलो त्यावर ती तेव्हा च  झोपी गेली असं प्रेमा म्हणाली, त्यावर मी पण मीही माझी काळजी नक्की घेईन म्हणत तिला गुड नाईट म्हणून फोन ठेवला.नंतर मी किचन मध्ये जाऊन फ्रीज मधून पिण्यास पाणी बॉटल  घेतलो व हातात बॉटल च टोपण काढत बेडरूम कडे वळलो,पण मनामध्ये विचार वेगळाच चालू होता. 

माधुरी माझ्या कॉलेज मधील माझी जवळची मैत्रीण……

       आमची ओळख शिष्यवृत्ती फोर्म भरण्यापासून झालेली, मग पुढे तीच ओळख हळू हळू एक चांगल्या मैत्री मध्ये रुपांतर झाली.मग आमचे मेसेज मध्ये होणारी चाटिंग अधिकच वाढायला लागली, आम्ही सर्व भावना एकमेकांना शेअर करत असो.यातच दोन वर्ष उलटून गेली,शेवटच्या वर्षी पुढील प्लान काय म्हटलं असता आमच्या पुढे काही नव्हत मग वाटल CA कराव व दोघांनी पण तयारी सुरुवात केली.पुढे कॉलेज आमच संपल शेवटच्या परीक्षा हि आम्ही उत्तीर्ण झालो.मग आता आम्हाला CA साठी फुल वेळ मिळालेला होता त्यातच तयारी करत असताना एका नामवंत कंपनी मध्ये ऑडीट करण्यासंबंधी जाहिरात होती,आम्ही नक्कीच CA उत्तीर्ण नसलो तरी अनुभव साठी दोघांनी मुलाखत दिली.त्यात माझ मात्र सेलेक्षण झाल. तेथून पुढे रोज नवीन नवीन कंपनी चे ऑडीट करण्यात मी व्यस्त झालो व त्यावर्षीचा निकाल फेल आला.तरीही धीर सोडून द्यायचा नसतो म्हणत आम्ही पुन तयारीला लागलो पण आता माधुरी सोबतचा सहवास आणि संपर्क दोन्ही कमी झालेलं. एके दिवशी तिचा मेसेज आला माझ लग्न ठरलंय,लग्नाला नक्की या CA साहेब,..... का?काय माहिती हि बातमी ऐकून थोड मी अस्वस्थ झालो.पण तरी तिला खूप भारी!!!!मी लग्नाला नक्की येईन म्हणून मेसेज पाठवलो.

     लागलीच मी CA उत्तीर्ण झालो,हि आनंदाची बातमी माधुरी सोबत शेअर करावी म्हणून तिला कॉल केला पण तो बंद आला, सर्वाना तिच्या नवीन नंबर ची विचारणा केली असता कोणाकडेही मिळाल नाही, थोडस मनाला सर्व जिंकून हरल्याचा भास झाला.ती कुठे,कशी आहे हे काहीच माहिती नव्हत,मग कशीतरी मनाची समजूत काढली व  पुन्हा त्या कंपनी मध्ये माझी जॉब पेर्मनंत झाली, मीही त्या कामा मध्ये व्यस्त झालो.रोज नवीन नवीन स्थळ वडिलांकडे येत असत, पण माझी कसलीच रुची त्यात नव्हती.शेवटी प्रेमा सोबत लगीन गाठ बांधली गेली.पुढे 2 वर्ष म्हणताच मनू जन्माला आली व माझ्याही मनातून माधुरी हे नाव धूळ खात कुठतरी पडल, पण आज अचानक आलेल्या नोतीफिकेषण ने परत भावना उफाळून येत होत्या….

           बेड वर पडल्या पडल्या हे सर्व विचार करत होतो, खरच अगदी मला समजून घेणारी व मला योग्य दिशा दाखवणारी अशी माझी मैत्रीण ती होती,फक्त एकच वाटत होत मरे पर्यंत आमची सोबत असावी, नवरा- बायको नसलो तरी राधा कृष्ण सारखी प्रीत असावी, जमल नाही कॉल वर बोलायला तरी आठवणीत सदैव असावी,आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करावी,नात्यामधून मैत्री व प्रेमाचा अर्थ कलावा,जमल कधी तर एकमेकांना गिफ्ट पाठवाव नाहीच तर वाढदिवसा निमित्त दान नक्की कराव,शेकडो किलोमीटर दूर असूनही मनाने जवळ असावे,प्रेमाच्या पलीकडेही आपल नात असाव,माझे सर्व सिक्रेट्स तू मनामध्ये ठेवाव  अशी हि आपली मैत्री तू हृदयात जपावस,जमलंच तर आयुष्यात एकदा तरी आपली भेट घडावी,त्या दिवशी लंच कॉफी आपण एकत्र घ्यावी,आपल्या नात्यावर कुठलाही डाग नसावा,चरित्र जपण्यासाठी आपण दोघांनीही प्रयत्न करावा,माझ्या आयुष्यातील सखी सोबती तूच असावीस_हे देवा, पुढल्या जन्मी मात्र तीच माझी अर्धांगिनी असावी…...


हुंडा

 सकाळचे  ५ वाजले होते. अलार्म वाजला,प्रज्ञा ने पांघरुणातून हळूच हात काढून तो बंद केला.इतक्यात ती खडबडून जागी झाली आज शेवटचा पेपर आहे,मग थोड वाचायला हव म्हणत तिने पांघरून बाजूला करत समाज - शास्त्राचे पुस्तक काढून सुरुवात केली. मार्क्स,दुर्खीम,पर्सन हे जवळपास पाठ झाले म्हणत तिने पुस्तक ठेवली आणि परीक्षेसाठी जाण्यास तयार होऊ लागली. नऊ वाजण्याच्या सुमारास ती पेन हॉल तिकीट घेऊन आई चाल्ले म्हणून घराबाहेर पडली. ११ ला पेपर चालू झाला,तिने जे पाठांतर केल होत,ते सर्व प्रश्न आलेले पाहून मनातून एकदम खुश होती.पेपर चा वेळ संपला,टोल पडली तसे सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर पडत होती.आज शेवटचा दिवस म्हणून बाहेर भेटण्यासाठी सर्व जन थांबली होती.त्यातच प्रज्ञा हि बाहेर येऊन आपल्या वर्गातील मित्र - मैत्रीणीना शोधत होती.तशी ती स्वरा दिसली व तिच्या दिशेने जाऊन भेटली. आता १२ वी झाली,नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार याची अपेक्क्षा होती.त्यामुळे पुढे काय करणार हे सर्व जन एकमेकास विचारत होती,पुढे हि आपण सर्व जन एकत्र प्रवेश घ्यायचा असं सर्व जन ठरवले व दुपारचे ३ वाजत आलेले म्हणून प्रज्ञा पण तेथून घराकडे निघाली. एकदाची बारावी संपली, यापुढे सुट्ट्या व रोज रोज पुस्तक घेऊन बसाव लागणार नाही याविचाराने ती खुश होती व मोठ्या पावलांनी चालू लागली. 

             घरी येताच दारात बाबा उभे दिसले, त्यांनी विचारण्य आधीच प्रज्ञा ने सांगून टाकल पेपर खूप भारी होता.बाबानी छान - छान म्हणत स्मित हस्य दिले. ती आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन आली व आई - ए - आई जेवाय दे बघ !! खूप भूक लागली मला पेपर लिहून म्हणत आई ला घरात शोधु लागली. आईने लागलीच तिला जेवण्यास दिल, आई आताही स्वयंपाक घरात कशी काय व म्हणून तिने विचारलं आता का करत आहेस स्वयंपाक. कोणी येणार आहे का? आपल्या घरला ? त्यावर आई ने म्हटलं तुला बाबांनी काही सांगितलं नाही का? नाही , का कोण येणार आहेत ? आग तुला स्थळ आलेलं आहे लग्नासाठी...खिन्न चेहरा करून प्रज्ञा काही बोलू नको य!!!!
मी खर बोलतेय,तू जेवण कर पाहू लवकर व तयार हो ५ वाजता ते येणार आहेत, आई म्हणाली. प्रज्ञा चा घास गिळता गीळेना. ती आई ला समजावू लागली, मला नको ग करायचं आताच लग्न....बाहेरून बाबा आले,हे बघ मुलगा रेल्वेत आहे सेंटर गवरमेनट ची नोकरी आहे,तू राणी बनून राहशील तिथे.पण बाबा मला पुढे शिकायचं आहे,बाळा हो, पुढे शिक न,ते सुशिक्षित आहेत तुला नक्कीच शिकवतील.तुला काहीही काळजी करायची गरज नाही त्यामुळे तू लवकर तयार हो बघू म्हणत बाबा प्रज्ञा ची समजूत काढत होते. शेवटी प्रज्ञा हि तयार झाली व पाहुणे मंडळी आल्यानंतर चहा घेऊन बाहेर आली. मनोहर, त्याचे आई बाबा आलेले होते व मध्यस्ती कोणीतरी होता, त्याची तेवढी ओळख प्रज्ञा ला नव्हती. मनोहर ने प्रज्ञा ला पाहताच पसंत केलं,पण पुन्हा आम्ही कळवू म्हणत ते निघून गेले. रात्री त्यांचा फोन आला, आम्हाला मुलगी पसंत आहे पण हुंडा आम्हाला ८ लाख हवंय.त्यावर प्रज्ञा च्या बाबांनी तुम्हाला लवकरच कळवतो म्हणत ,त्यावर मनोहर च्या बाबांनी आम्हाला लवकर सांगा कारण तुमच्याने होत नसेल तर आम्हाला दुसरे स्थळ पाहता येतील,असं उदार वाक्य म्हणत फोन ठेवला.
             प्रज्ञा चे बाबा झोपताना रात्री हे सर्व तिच्या आई ला सांगितले त्यावर तिने, थोड कमी करणार नाहीत का ? उद्या त्यांच्याकडे जाऊन बोलून या,...हे त्यांना हि पटल त्यामुळे सकाळी उठताच त्यांनी मनोहर च्या गावी निघाले.मनोहर चे बाबा आम्हाला पाहिजे तर ८ लाख, नसेल तर शक्य नाही म्हणून त्यांनी शब्द टाकला,स्थळ चांगल होत व मनोहर ला नोकरी म्हणून त्यांनी आता ५ लाख व पुन्हा 1 वर्ष नंतर ३ लाख देतो अशी बोलणी केली व त्यानच्या विवाह ची तारीख काढण्यात आली. 
             प्रज्ञा च्या मनात जरी नसल तरी आई - बाबा च्या विरोधात जाता येत नाही म्हणून तिने होकार दिला. अगदी 2 महिन्यांत लग्न झाल.प्रज्ञा सासरी आली, लग्न म्हणून मनोहर ने हि सुट्टी घेतलेली.१५ दिवसांनी मनोहर ची सुट्टी संपली व तो नोकरी च्या गावी परत गेला. पुन्हा क्वार्टर मिळाल कि आपण सर्व तिकडेच जाऊ म्हणत त्याने प्रज्ञा ला घरीच ठेवून गेला.तो गेल्यानंतर हळू हळू त्याची आई व प्रज्ञा ची सासू ने तिला मदत करणे टाळून सर्व कामे तिच्याकडून करून घेण्यास सुरुवात केली. रोज नवीन नियम घरात उदयास यायचा. जसे - बाहेरच्या बायकांशी बोलायचं नाही, मनोहर आणि तुझे बाबा यांना याबद्दल काही सांगायचं नाही म्हणजे आता तिचे हक्क एक एक करून काढून घेण्यात येत होते व ती गुलाम अवस्थेत जात होती. 
            एकेदिवशी पावसाळ्याची चाहूल लागताच सासूबाईने प्रज्ञा ला हुंड्याचा प्रश्न केला, तुझा बाप कधी देणार आहे राहिलेला हुंडा ?? यावर निरुत्तर स्वरूपातील उत्तर ऐकून सासू तिच्यावर रागावयास सुरुवात केली, रोज बोलते कि ग अवदसा फोनवर मग हे कामाचं तुला बोलता नाही येत का ? आता पुढच्या वेळी नक्की बोल म्हणत सासू ने तिला धमकावून सोडलं, ती बेडरूम मध्ये जाऊन एकटीच रडत बसली. काही दिवसांनी तिचा निकाल लागला, ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली म्हणून तिच्या बाबांनी तिला फोन केला, त्यावर ती तेवढ्या खुशीने प्रतिक्रिया त्यांना दिली नाही, तेव्हा बाबांनी काही झालं आहे का बाळा म्हणून विचारपूस करू लागले,तेवढ्यात तिने फोन ठेवला. हे त्यांच्या मनाला लागल म्हणून त्यांनी लगे दुसऱ्या दिवशी सासर गाठल. मग सासू आणि सासरे यांनी हुंडा साठी तमाशाच सुरु केला. ठीक आहे मी आणून देतो म्हणत ते निघून आले, प्रज्ञा च्या आईला सांगितलं त्यावर तिने म्हटलं बघा आपल्याला एकच मुलगी मग आपल्या माघाऱ्या आपल्या शेताला वारीस तीच आहे मग एक्कारभर शेत आपण तिच्यासाठी लिहून देऊयात व हुंडा फेडू एकदाचा, यावर थोड मनाला सुखद धक्का प्रज्ञा च्या बाबांना भेटला व त्यांनी हि तसच केल. 
            बारावी चा निकाल लागल्याने प्रज्ञा ने पुढील शिक्षण घेण्याचा प्रस्ताव मनोहर कडे ठेवला, त्यावर मनोहर ने सहमती दर्शवली पण हि गोष्ट जेव्हा त्याच्या आई ला समजली तेव्हा परत तिने तुला अक्कल नाहीय का ? म्हणत प्रज्ञा वर ओरडू लागली. शिकायचं होताच तर मग लग्न कशाला करून घेतलं. व आता लग्न केलाय तर तुला कुठ कमवायला जायचं आहे, आम्ही खाऊ घालत नाहीय का ? अशे प्रचंड बोलणे ऐकून ती एकदम निपचित झाली. काही दिवसांनी मनोहर सुट्टी वर आला,आल्या नंतर आई चे ऐकून त्यानेही तिच्यावर प्रचंड रागवावयास सुरुवात केली.आता पावसाळा येत आहे घरी बाबा एकटेच आहेत मग शेती साठी ट्रक्टर लागणार आहे मग तुझ्या बाबा ला ४ लाख पैसे दे म्हणव नाहीतर तुला येवून घेऊन जा, त्यावर प्रज्ञा ने हुंडा दिले न बाबांनी सर्व मग आता कशाचे मागत आहात? यावर मनोहर रागवून, तू माझ्याशी उलट बोलते काळे!!!!तुझी एवढी हिम्मत म्हणत मारायला सुरुवात केली.सासू - सासरे दारातून पाहत होते, आपल्या पोराला स्त्री वर हात उचलायचा नसतो हे सांगण्या ऐवजी मजा घेत होते व त्यात आणखी साद घालत होते, असली पांढऱ्या पायाची असेल म्हणून आम्हाला वाटल नव्हत?
घरच आयत बसून खात आहे आन बापा कडून काही माग म्हटलं कि नकोत्याने उलट बोलत आहे, काळी कुलेटी कुठली...!!!
                 हे सर्व प्रज्ञा पांघरुणात पडून रडत - रडत ऐकत होती, आता बाबा ला लग्न मोडा किंवा पैसे द्या असं कोणत्या तोन्दाने मागाव म्हणून ती आणखी हुंदके देत रडत होती. शेवटी या रोजच्या जुल्माला एकच उपाय म्हणून ती घर सोडण्याचा निर्णय घेतली. रात्री सर्व जन जेवण करून झोपले असता अनामत उठून हि घराबाहेर पडली, व चालता चालता पावलांनी विचार करू लागली....,
लग्न लाबले बाबांनी मी राणी बनून
राहील म्हणून, 
छळ केले माझा मी सून आहे म्हणून,
नवर्याने मारलं मला मी बायको आहे म्हणून,

म्हणत आहेत आमच्या जीवावर जगत आहेस म्हणून,
काळी - कुलेटी, पांढऱ्या पायाची म्हणत आहेत मला 
मी त्यांना पैसे आणून देत नाही म्हणून,

समाज स्वीकारणार नाही आता मला मी घर सोडलं म्हणून.... 

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...