जय ने बाहेर जाऊन delivery घेतली व आत आला तोपर्यंत मनीषा जेवणासाठी प्लेट लावण्याची तयारी करत होती.पुन्हा दोघांनीही मिळून वाढून घेतले व जेवण्यास सुरुवात केली. मनीषा च्या आवडीचे जेवण असूनही आतल्या विचारांमुळे तिला जेवण जात नव्हते, व मनीषा जेवत नाहीय या काळजीने जय चे जेवण कमी झाले. पण करणार काय.
(जय अगदीच बुचकळ्यात सापडला होता.)
यावर उपाय म्हणून जय ने मनीषा ला प्लेट मध्ये असलेल्या घासांची विभागणी करून आई,वडील यांच्या नावाने घास घेण्यास सांगितले व तिला अन्य विचार नको करू म्हणून बाधित केले. त्यावर कसतरी मनीषा व जय ने जेवण संपवले. मनीषा प्लेट्स आणि पार्सल चे पेकेट घेऊन आत गेली तोवर लगेच जय ने पोचा मारून सफाई केली.दरम्यान मनीषा चे हि भांडे घासून झाले होते. मग दोघे हि tv पाहत बसले.
मनीषा, अग एक विचारू का ?
आज पाहतोय दिवस झाल तू खूप विचार करत आहेस बघ, अग आजार झाला आहे, मान्य आहे, पण मग आता त्यावर विचार करून काही होणार आहे का ?
अग, आपण राहिलेले दिवस तरी चांगले आनंदी जगुयात न please...
जय, अरे please नको म्हणू, अरे अगोदरच मी तुझी गुन्हेगार आहे, व वरून तूच please म्हनातोयस,
अग, मग तू पण विचार सोड न आता, थोडस हस ना,
हस बघू,
अरे नाही रे जय, आज आपण चालत आलो न त्यामुळे मला थकवा जास्त होतोय व पूर्वीच अशक्तपणा आहे न,
हा, चल मग झोपू, उद्या येतील आई - बाबा....
म्हणत जय tv समोरून उठला,
अरे हा, मग सकाळी लवकर उठाव लागेल, थोड घर स्वछ कराव लागेल म्हणत मनीषा हि उठली,
नको, नको तू उद्या झोपून रहा,काळजी घे.... मी व आई आहोत न दोघ जन करतोत आंम्ही,
म्हणत जय मनीषा च्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत आत घेऊन आला.
जय ने लाईट बंद केली व तो झोपी गेला, पण अद्याप मनीषा ला झोप लागली नव्हती,
उद्या आई बाबा येणार आहेत, आता त्यांना कस सांगू मी ? मला एड्स आहे... त्यांना कस सांगू मी त्यांना वारस देऊ शकत नाही.....त्यांना कस सांगू जय हि इंफेक्टेड आहे....
उद्या आई बाबा आले असता जर मी प्रेगनंट असते तर ते किती खुश असते, आता उद्या त्यांना कस बर बोलायचं ?
सर्व नातेवाईक, गावात याबाबतच चर्चा होणार, मला अपत्य का नाही ? याचे उत्तर मी कसे देऊ, समाजात मला तोंड काढता येणार नाही... व एड्स संबंधी समजल तर मला नक्कीच सगळे जन वाळीत टाकतील....
छे, छे असे काही होणार नाही, जय आहे न सोबत आपल्या व असही आपले राहिलेतच किती दिवस?
याविचाराने मनीषाच्या डोळ्यांतून अपोआप अश्रू ओसळत होते, मनात पूर्णतः दुख दाटून आले होते,
मनीषा स्वताशीच झालेल्या चुकांची उजळणी करत होती, कदाचित मी क्षणभर सुखासाठी भारावले नसते तर आज एवढ्या मोठ्या दुखा ला तोंड द्यायची गरज लागली नसती.... अगदी प्रत्येक क्षणी व पावलावर मदत करण्यसाठी जय माझ्या सोबत आहे.....जय अरे तू मला पहिलं का नाही रे भेटलास? कदाचित आज आपल जीवन वेगळ असत... मनीषा स्वतः शीच बोलत होती.
या सर्व प्रश्नामुळे ती अगदी स्वतावर आतून चिडली. व अश्रूना वाट करून द्यायची होती पण जय उठेल या भीतीने तोंड दाबून अश्रुना वाट करून देत होती,
cont....
No comments:
Post a Comment