Saturday, February 19, 2022

मनीषा आणि मयंक (भाग 6)

चालत चालत जय व मनीषा घराजवळ पोहोचले, आज दोघही एकमेकांना खूप जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. घरी पोहोचल्या नंतर जय ने मनीषा ला आज जेवण्यास आपण ऑर्डर करूयात का ? म्हणून विचारलं,
अरे,पण आपल्याला डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितलं आहे न, 
 अग हो, तुझ बरोबर आहे...पण बघ आपण आताच चालत आलोत व त्यामुळे खूप थकलो आहोत,त्यामुळे आता माझी तर किचन मध्ये येण्याची बिलकुल इच्छा नाही बघ,
व डॉक्टर नी तुझी विशेष काळजी घेण्यास सांगितली आहे मग त्यामुळे आपण ऑर्डर च करूया....
हो बाबा, मग कर ऑर्डर आता कसही dinner ची वेळ झालीच आहे. 
तू order कर तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते. 

जय ने mobile काढून उत्तम रेस्तोरंट मधून मनीषा च्या आवडीच मंच्यूरियन,पालकपनीर आणि तंदूर order करून tv on केली. व स्तब्ध बसून राहिला. tv मधील आवाज कानावर background music प्रमाणे पडत होता. तो आज घडलेल्या गोष्टी वर विचार करत होता. 
एवढ्यात मनीषा आली व काय पाहतोय ? म्हणत जय ची शांतता तोडली, अरे काही नाही...मी order केलोय, तू पहा tv मी फ्रेश होऊन आलोच म्हणत जय ने मनीषा च्या हाती रीमोट दिला. 
मनीषा रिमोट घेतली खरे, पण तीही आतून अगदी शांत होती...

        तिला स्वतः च्या केलेल्या चुका आठवत होत्या. ज्यामुळे आज तिला या परिस्थिती चा सामना करावा लागत होता. तिला त्या चुकांचं प्रायश्चित करायचं होत, तसेच जय ला हि सांगायचं होत पण जय ते सर्व विसरून खूप पुढे निघाला होता व मनीषा ला आहे त्या स्तिथीत मान्य करून जिवाप्रमाणे तिची काळजी घेत होता. 
मनीषा १२ वी नंतर दुसऱ्या शहरात मोठ्या कोलेज मध्ये प्रवेश घेवून वस्तीग्रहात राहत होती.  १२ वी पर्यंत गावात राहिल्यामुळे व घरी असल्यामुळे ती थोड्याश्या बंधनात होती. पण पुन्हा शहरात गेल्या नंतर नवीन मैत्रिणी यांच्या सोबती मुळे ती थोडी फ्री झाली व यातून कॉलेज च्या द्वितीय वर्षात तिला मयंक चे आकर्षण होऊन ती त्याच्या प्रेमात पडली.
         पुढे कॉलेज च्या शेवटच्या वर्षात असताना मयंक आणि मनीषा दोघांची जोडी अगदी कॉलेज मध्ये गाजली. यामुळे पुन्हा जेव्हा मनीषा च्या आई वडिलांना समजल तेव्हा त्यांनी मनीषा ला गावी बोलावून घेतलं. व मयंक चा संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली. सोबतच वडिलांनी मनीषा कडील मोबाईल हि काढून घेतले. तेव्हा मनीषा वडील सकाळी उठून शेतात पाणी देण्यास गेले असताना व आई घरकामात व्यस्त असताना मनीषा, आई केव्हा वडिलांच्या mobile वरून call करून बोलत असत. व तत्काळ call history डिलीट करत असत.यामुळे तिचे प्रेम अगदी पूर्वी प्रमाणे ताजे टिकून होते.

           हे सर्व विचार मनात येत असतानाच जय फ्रेश होऊन आला व order डेलीवर झाली का ? असा प्रश्न केला. 
मनीषा स्वताच्या धुंदीत होती. तेव्हा जय ने मनीषा ला हलवून मनीषा, मनीषा....
अग, तू परत काय विचार करतेस,
मी म्हणल न मी सोबत आहे तुझ्या, काही होणार नाही,
काळजी नको करू....

एवढ्यात mobile वर your फूड is arriving म्हणून नोटीफिकेशन आली, 
जय ने मनीषा च्या बाजूला बसून काळजी नको करू, मी आहे न म्हणत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला,
व मनीषा चे डोळे अगदीच पाणावले....
                                                                                                                          cont....

No comments:

Post a Comment

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...