जय, मनीषा ला समजवत हॉस्पिटल बाहेर घेऊन आला, लोकांची गर्दी वगैरे पाहून मनीषा हि थोड स्वताला आवरली,आणि मग दोघे हि हॉस्पिटल बाहेरील त्या गार्डन मध्ये बसले. बसले असता दोघेही शांत होते, कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते पण मनात दुखाचा सागर होता.
पुढेच गार्डन मध्ये दोन वयोवृद्ध बसले होते,
त्यांना पाहून जय ला काहीतरी सुचल व तो मनीषाच्या हातात हात देऊन तिला विश्वास देत, मनीषा ते बघ आजी - आजोबा,
अग मला त्यांना पाहून न माझी स्वप्न आठवतात, मला जेव्हा कळायला लागल न कि प्रेम खऱ्या अर्थाने काय असत तेव्हा पासून मी एकच विचार केलेला, कि मी माझ्या प्रेमाला कोणत्याही परिस्थिती मध्ये एकट नाही सोडणार. मग तो आज असो किंवा उद्या चालून आपण म्हातारे होऊ, पण माझ प्रेम कदापि कमी नाही होणार....,
अग आज आपण तरुण आहोत, आज आपल्याला जे हव ते आपण स्वतः करू शकतो पण उद्या उतार वयात आपणास ते थोड जमणार नाही मग तेव्हा आपण दोघ मिळून काम करू, पण मी तुझी साथ सोडणार नाही. म्हणतात न खर प्रेम कधीच कमी होत नसत...
अगदी त्यापध्दतीने मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थिती मध्ये प्रेम करीन,...
मनीषा अगदी रडवेल्या स्वरात, हो रे जय, पण मी तुझी साथ सोडेन....या विचारानेच मला कसतरी होत आहे,
तू म्हण्तोयस न कि तुझी स्वप्न होती उतार वयात हि प्रेम करणे, ते मी पूर्ण नाही करू शकत रे...माझ्याजवळ आता वेळ उरला नाही,
जय एक ऐकशील का रे , हो बोल न जय म्हणाला
अरे मी मेल्या नंतर तू दुसर लग्न करून घे, please
काय ?????
अग असल आगाव काहीपण बोलू नको बर,
व राहिला प्रश्न माझ्या प्रेमाचा, माझ्या स्वप्नाचा तर ते तू, तूच आहेस मनीषा
व ते मला कोण दोघानाम्ध्ये वाटायचं नाहीय,आणि मलाही HIV आहेच न मग तू चल समोर मी पण येतोच तुझ्या मागे....थोड हसवण्याचा प्रयत्न जय ने केला,
पण आज दोघ हि गंभीर वाटेवर उभे असल्याने त्यांना हसता आले नाही.
नशीब किती खेळ करतो न रे जय,
जेव्हा मला तुझ्यासोबत राहायचे नव्हते तेव्हा मी एकदम ठीक होते व आज मला तुझ्यासोबत जीवन जगायचे तर माझी वेळ संपलेली आहे,
एवढ्यात जय ला call आला, आईचा फोन म्हणत जय ने उचलला
हेल्लो, अरे काय झाल तू फोन करतो म्हणाला होतास न ?
मग फोन का करत नाहीस, सुनबाई बरी आहे न ?
हो आई ती बरी आहे, व मी तुला इतक्यात call करणारच होतो,
का रे, काय झाल, अग काही नाही.... बर बाबा आहेत का जवळ?
हो आहेत न, एक मिनिट, देते त्यांना.... जय च्या आईने बाबांना फोन दिला,
हलो बाबा थोड काम होत मग आईला घेऊन याल का ? खूप दिवस झाले व आता मनीषा पण बरी झाली आहे मग तुम्ही आलात तर मदत होईल आम्हाला,
ठीक आहे आम्ही येतो, म्हणत जय च्या बाबांनी फोन ठेवला.
मनीषा, जय असं का वागतोय म्हणून दंग झाली.... त्यावर जय ने मनीषा ला ओळखून उत्तर दिल, अग आपण आपल्या आई - बाबा सोबत राहू, मी तुझ्या पण आई बाबा ला बोलावून घेतोय, म्हणजे आपल्याला आजार आहे याची जाणीव असणार नाही, व दुख:तील हे दिवस सुखात जातील...
जय, तू खरच कितीरे काळजी करतोयस माझी,
व एक मी आहे जिच्यामुळे तुला तुझही जीवन गमवाव लागणार आहे, म्हणत परत एकदा मनीषा रडू लागली.
मनीषा, अग please नको रडू व मृत्यू अटळ आहे ग, त्यामुळे तू please नको न तेच ते विचार करू,
जय, अरे खर सांगू का मी तुला,
अरे पूर्वी तू मला नाही आवडायचास, तुला नोकरी लागली व माझ्या आई वडिलांनी तुझ्या सोबत लग्न लावून दिले,
अग, परत तूच तेच तेच का बोलत आहेस, झाल ते विसरून जा न आता,
तू माझ्या वर आता प्रेम करतेस न, मग बस झाल,
व मी, खर प्रेम हे तुझ्या भूतकाळावर नाही तर मी वर्तमान मध्ये करतो व भविष्यातही नक्की करेन,
त्यामुळे आपला भूतकाळ सोडून दे पाहू, म्हणत जय उठला
चल आता आपण थोड पायी चालत जाऊ, खूप दिवसांनी वेळ भेटला....
म्हणत जय ने मनीषा ला हात देऊन उठवल व दोघे हि चालाय लागले,
cont....
No comments:
Post a Comment