मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी आले व please बाबा ला सांग न म्हणत ती घाई-घाई मध्ये आत निघून गेली. फ्रेश होऊन बाहेर आली व आई ला मदत करू लागली. आज अचानक झालेला बदल तिच्या आई ला पचत नव्हता, त्यामुळे आई ने विचारलं काही आणखी हवंय का ? अग नाही काही, असच वाटल म्हणून आले मदतीला....देव करो तुला रोज सद्बुद्धी मिळो... म्हणत आई परत कामाला लागली काही वेळातच रात्री चे जेवण तयार झाले.मग मनीषा चे वडील घरी आल्यानंतर सर्व जन जेवण करून आपापल्या रूम मध्ये गेले.
मनीषा हि रूम मध्ये गेली दरवाजा लोक केली व mobile काढून बसली. आज ती खुश होती कारण शहरात जाण्याच्या बहाण्याने का होईना तिला तिचा mobile वापस मिळाला होता. मग ती त्याला silent करून च ठेवली होती, ज्यामुळे परत तिच्या mobile साठी संकट तयार होऊ नये.तिने या उत्साहात मयंक ला पोहोचले असल्याच मेसेज केल.काही क्षणातच मयंक चा रेप्लाय आला व मनीषा मनातून हसत मयंक सोबत बोलत बसली. बोलता - बोलता केव्हा 1 वाजल या च दोघानाही भान राहिलं नाही. व पुढे हे रोजच चालल, बोलत असताना दोघ हि काय योग्य अथवा काय अयोग्य याचा किंचित हि न विचार करता बोलत असत त्यामुळे मनीषा आणि मयंक दोघांच्याही मनात वासना निर्माण होत होती. यामुळेच एके दिवशी मयंक ने संधी साधून व न राहवता मनीषा please वापस ये ना ग...आता तुझ्याशिवाय राहवत नाही,त्यामुळे येशील ना...म्हणत मयंक ने अगदी तिला लुभावून वापस शहरामध्ये बोलावून घेतलं.
ती पूर्वीप्रमाणेच शहरामध्ये आली व मयंक तिला नेण्यास अगोदरच येऊन थांबलेला होता,दोघही एकमेकांकडे पाहून अगदीच खुश झाले. मयंक ने तिला गाडीवर बसवत आज मित्राच्या रूम वर नेलं व मित्रांना पूर्वीच सांगितलं असल्याने त्याचे एकही मित्र तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आज रूम मध्ये दोघच होते व आज त्यांना रोखण्यासाठी किंवा अडवण्यासाठी कोणीच नव्हत. ते दोघे हि एकमेकांवर वासनेच्या भूकेपोटी तुटून पडले. यामुळे दरम्यान त्यांना या अवस्थेत हवी असणारी सुरक्षा अथवा घ्यावी लागणारी काळजी या दोन्हीचे काहीच भान न ठेवता ते दोघेही स्वताची भूक मिटवण्याचा प्रयत्न करत होते. अगदी तासाभरात दोघांचीही भूक पूर्ण पणे शांत झाली होती. त्यामुळे दोघेही एकमेकास बिलगून शांत झोपले. पुन्हा अर्ध्या तासाने जेव्हा मनीषा उठली व आपण काय केलो याची जेव्हा शुद्धी तिला आली तोपर्यंत वेळ निघून गेला होता. मयंक अद्याप झोपला होता, तिने तिच्या अंगावरून त्याचा हात काढला व पटकन फ्रेश झाली व रूम च्या बाहेर जाण्यासाठी तयार झाली. मयंक मनीषा च्या या आवाजाने उठला, अग काय करत आहेस हे ?कुठे निघालीस.... मयंक अरे मला लग्नाच्या आधी हे असल नव्हत करायचं.... तू मला का आणलास इथे मनीषा रडत मयंक ला विचारत होती....
मयंक अग मनीषा तू माझीच आहेस मग मी तुझ्यासोबत असं केल तर काय झाल....उद्या लग्न झाल्यास करायचं ते आपण आज केल....यात काही चुकल नाही, तू शांत हो बघू म्हणत मयंक ने मनीषा ला समजावण्याचा प्रयत्न केला. व मयंक च्या प्रेमामध्ये ती शांत झाली. मयंक अरे आता मला जायला लागेल, नाहीतर पप्पांना समजल कि अवघड होईल, मला सोड न, चल.... हो थांब म्हणत मयंक एकदम रेडी झाला.
दोघेही बाहेर आले मयंक गाडी काढत होता, मनीषा तोंडावर स्कार्फ बांधत होती व एवढ्यात कोणीतरी मनीषा ला हाक मारली, मनीषा अगदीच घाबरून गेली, व त्या आवाजाकडे हि न बघता ती लगेच मयंक च्या गाडीवर बसली व निघून गेली. मयंक अरे कोण होत तिथे मला ओळखणार....त्यांनी माझ्या घरी तर नाही सांगितले न...मनीषा मयंक ला प्रश्न विचारून स्वतः ला बळ देण्याचा प्रयत्न करत होती. अग कोणी नाही ओळखत तिथे आपल्याला, तो नवीन अरिया आहे व तू काळजी नको करू तू त्यांना बोलली नाहीस न व तुझा चेहरा झाकून होता मग काळजी नको करू. चल आपण इथे जेवण करूयात व मी तुला बसवतो बस मध्ये म्हणत मयंक तिला हॉटेल मध्ये नेला. मयंक च्या सानिध्याने तिला ख़ुशी व्हायची व ती सर्व तणाव विसरून फक्त त्याचीच व्हायची. जेवण केल्यानंतर मयंक ने तिला बस मध्ये बसवला व बस निघाली.
तासाभरात जेव्हा बस गावी पोहोचली तेव्हा मनीषा च्या आधी मनीषा ची बातमी पोहोचली होती. मनीषा च्या मावशी च्या दिराने तिथे नुकतेच घर घेतलेले होते व ते पाहण्यासाठी तिची मावशी तिथे हजर होतीच.व तो नवीन एरिया असल्याने त्याबाबतची माहिती हि मनीषा ला नव्हती.यामुळे मनीषा पूर्णता फसली होती. तिच्या समोर आता एकही शिल्लक रस्ता नव्हता. मनीषा च्या मावशीने फोन करून फक्त एवढच म्हणल कि जाताना जी मनीषा होती ती येताना परतत नाहीय....., त्यामुळे घरी तिचे आई - वडील दोघेही विचारण्यासाठी अगोदरच तयार बसले होते. पण मावशीची बातमी ऐकून आई -वडील एक शब्दही तिला न बोलता तिला आत कोंडून टाकले व वडील तिचे लग्न करण्यासाठी मुलाचा शोध घेऊ लागले. व योगा-योगाने नातेवाईक मधेच असणारा जय याचा नुकताच निकाल लागला होता व त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. यामुळे मनीषा च्या वडिलांनी लवकर त्यांची भेट घेतली जय ला मनीषा पसंत होती त्यामुळे मुलाकडून सर्व होकार होता, व काही दिवसातच मग दोघांचेही लग्न लावण्यात आले.
लग्न होऊन ही मनीषा जय ची झालेली नव्हती,पण पुन्हा सहा महिन्यानंतर तिच्या फायनल परीक्षा वेळी मयंक हयात नसल्याचे समजले व मनीषा अतिशय दुखी झाली, पण आईंच्या आणि मावशीच्या समजावण्याने मनीषा जय सोबत नोकरी च्या गावी राहण्यास आली व जय च्या सहवासात ती मयंक ला केव्हाच विसरली होती. व आज मनीषा साठी जय हा सर्वस्व होता, पण अचानक समजलेल्या बातमीने ती पूर्णता कोलमडली.
हे आठवून मनीषा आणखीन जास्त रडत होती,पण आता मात्र हे दुख तिला सहन होत नव्हते, व अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते, यामुळे मनीषा चे गाल पूर्णतः ओलावून गेले होते, व मनीषा झोपलेली ऊशी अगदी भिजली होती, मनीषा विचारांनी भानावर नव्हती, तिला फक्त मनातील दाटून आलेल्या दुखाला वाट करून द्यायची होती. तोंड दाबून धरून हि विरह संपत नव्हता व अश्रू थांबत नव्हते तेव्हा मनीषा बेडशीट ला घट्ट हाताने पकडून आवाज न येऊ देता रडू लागली.. पण बाजूलाच जय दिवसभर थकल्याने झोपला होता म्हणून मनीषा बेडवरून उठली व किचनमध्ये गेली. तिथे असलेला पंखा चालू करून स्वताला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण आज ती मनच ऐकणार नव्हती...बाजूलाच गोळ्यांची पिशवी दिसली व कुठेतरी वाचलेलं आठवल overdose of medicines can stop breathing तिला या वेदना, प्रश्नांची उत्तरे, समाजाला तोंड देणे आणि जय च्या नजरेत पडणे हे काहीच नको होत त्यामुळे यावर तिला एकच पर्याय आज समोर दिसत होता, ती क्षणाचाही विचार न करता त्यावर अंमल करण्यसाठी ग्लास व गोळ्यांची शोधाशोध केली.काही क्षणातच तिने सर्व ५०० व त्यापुढील power च्या गोळ्या एकत्र करत त्यांना गिळून घेत पाणी पिली, व एका कागद वर लिहिण्यास सुरुवात केली - आता हा माझा शेवटचा क्षण आहे रे जय मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे, संसार सजवायचा आहे, आपल्या बाळा ला हि मला खेळवायचे आहे पण ती स्वप्न - स्वप्न च राहिली.....मी तुझी, आपल्या परिवाराची सर्वांची गुन्हेगार आहे, शक्य झाल तर मला माफ कर... मी याघरची सून व तुझी पत्नी म्हणून तुला खूप त्रास हि दिला, पण मान्य कर रे कदाचित माझ आयुष्य एवढ म्हणून मी त्यापद्धतीने जगले.....,
जय उद्या मम्मी - पप्पा आल्या नंतर माझ्याकडून माफी माग ना रे please, माझ्या कर्मांची शिक्षा मला भेटली आहे पप्पा त्यामुळे किमान आता तरी मला माफ करा....व तुम्ही सांगितलेलं कदाचित ऐकले असते तर नक्की मीही जिवंत असते मम्मी खरच मला माफ कर, मी या आजारा नंतर तुम्हाला तोंड दाखवू नाही ग शकत, मी खूप आज मनातून खचले आहे,
तसेच आई - बाबा मी तुमची पण गुन्हेगार आहेच, माझ्यामुळेच तुमचा पोटचा गोळा असलेला जय तो हि बाधित आहे त्यामुळे तुम्ही माझ्या ऐवजी जय ला वाचवून घ्या.... माझ्या कर्माची शिक्षा मला मिळाली आहे....
आणि हो जय मला माहित आहे तू माझ्या साठी काहीही करू शकतोस पण please मला वाचवण्याचे प्रयत्न करू नकोस, हीच माझी शेवटची इच्छा समज.....I love you Jay
एवढे लिहून मनीषा ची पेन थांबली व मनीषा ची शुद्धी आता हरपत चालली होती.....
The End_